आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
रक्तदान अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित राष्ट्रव्यापी महा रक्तदान शिबिरात भारताने ऐच्छिक रक्तदानात गाठला एक नवा टप्पा
डॉ मनसुख मांडविया- "87,000 हून अधिक ऐच्छिक रक्तदात्यांनी केले रक्तदान, भारताने आज एक नवा जागतिक विक्रम केला प्रस्थापित"
ई-रक्त कोश पोर्टलवर आतापर्यंत 1.97 लाखांहून अधिक रक्तदात्यांची तर महा मोहिमेसाठी 6,000 हून अधिक रक्तदान शिबिरांची झाली नोंदणी
राष्ट्रपतींच्या हस्ते प्रारंभ झालेल्या प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत 15,000 हून अधिक मित्रांनी 9.5 लाखांहून अधिक क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी वचनबद्धता दर्शविल्याने अभियानाला गती
Posted On:
17 SEP 2022 8:49PM by PIB Mumbai
एका दिवसात 87,000 (87,137) पेक्षा जास्त लोकांनी स्वेच्छेने रक्तदान केल्यामुळे (आज संध्याकाळी 7:40 पर्यंतच्या तात्पुरत्या अहवालानुसार), देशाने पूर्वीच्या सर्वोत्तम 87,059 (2014) या आकडेवारीला मागे टाकत आज एक नवीन जागतिक विक्रम रचला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज, नवी दिल्ली येथील सफदरजंग रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करून सुरू केलेल्या रक्तदान अमृत महोत्सवातील, देशव्यापी महा स्वेच्छा रक्तदान मोहिमेतील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे. डॉ. मांडविया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये या विलक्षण कामगिरीचे कौतुक केले:
या देशव्यापी मोहिमेची आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, या महा मोहिमेसाठी ई-रक्त कोश पोर्टलवर आतापर्यंत 6,136 शिबिरांची नोंदणी करण्यात आली आहे तर 1.95 लाखांहून अधिक रक्तदात्यांनी देखील आपली नोंदणी केली आहे (लिंक: https://www.eraktkosh.in/BLDAHIMS)
सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल, म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबर 2022 रोजी सुरू केलेले, 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट असलेले 'प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान'. प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हे पंतप्रधानांच्या नागरिक-केंद्रित धोरणांचा विस्तार असून क्षयरोग या पूर्णपणे बऱ्या होणाऱ्या आजाराच्या उपचारांबाबत वर्धित जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. शासकीय आरोग्य केंद्रात हे उपचार मोफत उपलब्ध आहेत.
आतापर्यंत सुमारे 13.5 लाख क्षयरोग रुग्णांनी निक्षय पोर्टलवर आपली नोंदणी केली असून त्यापैकी 9.5 लाख उपचाराधिन क्षयरोग रुग्णांनी दत्तक जाण्यासाठी संमती दर्शवली आहे. त्यामुळे या उपक्रमाला गती मिळाली आहे.
नि - क्षय 2.0 पोर्टल ( https://communitysupport.nikshay.in/ ) क्षयरोग रूग्णांचे उपचार परिणाम सुधारण्यासाठी अतिरिक्त रूग्ण सहाय्यता प्रदान करणे, 2025 पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्यासाठी समाजाचा सहभाग वाढवणे तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाचा लाभ घेण्यास मदत करत आहे. (CSR) संधी.
निक्षय मित्र वेबसाइटवर देखील आपली नाव नोंदणी करू शकतात. अशा 15,000 हून अधिक मित्रांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे आणि 9.5 लाखांहून अधिक क्षयरुग्णांना मदत करण्यासाठी वचनबद्धता दर्शविली आहे.
***
S.Thakur/S.Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860353)
Visitor Counter : 136