गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
17 SEP 2022 9:59AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो. मोदींनी आपल्या भारत-प्रथम दृष्टीकोनाने आणि गरिबांच्या कल्याणासाठीच्या संकल्पाने अशक्य कामे शक्य करून दाखवली आहेत.
गरीबांचे कल्याण, सुशासन, विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि ऐतिहासिक सुधारणांसाठी एकाच वेळी आणि सतत प्रयत्न करून मोदींनी भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचा आपला संकल्प पूर्ण केला आहे. त्यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या अतूट विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे असे ते म्हणाले.
सुरक्षित, सशक्त आणि स्वावलंबी नवीन भारताचे निर्माते असलेले मोदी यांचे जीवन सेवा आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचेही अमित शहा म्हणाले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोट्यवधी गरीबांना त्यांचे हक्क देऊन मोदींनी त्यांच्यात आशा आणि विश्वासाची भावना निर्माण केली आहे, आज समाजातील प्रत्येक घटक भक्कमपणे मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि त्याचा प्रचार करून, मोदींनी देशाला त्याच्या मुळाशी जोडत विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले आहे. आजचा नवा भारत, मोदींच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून उदयास आला आहे, एक जागतिक नेते म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे, त्यांचा जगभरात आदर होत आहे असे शहा म्हणाले.
***
Sushama K/Vinyaka/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1860063)
Visitor Counter : 196