पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे रशियन महासंघाच्या अध्यक्षांची घेतली भेट
Posted On:
16 SEP 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) 22 व्या बैठकीच्या निमित्ताने आज रशियन फेडरेशनचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची उझबेकिस्तानमध्ये समरकंद येथे भेट घेतली.
विविध स्तरांवरील संपर्कासह द्विपक्षीय संबंधांमधील निरंतर गतीची नेत्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी या महिन्याच्या सुरुवातीला व्लादिवोस्तोक येथील पूर्व आर्थिक मंचामध्ये दिलेल्या व्हिडिओ-संदेशाबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी कौतुक व्यक्त केले.
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली.
सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांच्या संदर्भात, जागतिक अन्न सुरक्षा, ऊर्जा सुरक्षा आणि खतांची उपलब्धता या मुद्द्यांवर देखील यावेळी चर्चा झाली.
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात, पंतप्रधानांनी युद्ध लवकर बंद करण्याच्या तसेच संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या गरजेचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांमधील चालू वर्षातील ही पहिलीच बैठक होती, जी परस्परांबरोबरच्या राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्षाचे महत्व अधोरेखित करते. संपर्कात राहण्यावर दोन्ही नेत्यांची यावेळी सहमती झाली.
S.Patil /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859959)
Visitor Counter : 161
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam