वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्र सरकारने राष्ट्रीय तंत्रज्ञान निगडित वस्त्रप्रावरणे अभियानाअंतर्गत (एनटीटीएम)विशेष प्रकारचे धागे, संमिश्र, शाश्वत वस्त्रे, मोबिलटेक, स्पोर्टेक आणि जिओटेक प्रकारच्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी 60 कोटी रुपयांच्या 23 धोरणात्मक प्रकल्पांना मंजुरी दिली
भारतातील तंत्रज्ञाननिगडित वस्त्रांच्या वापराच्या क्षेत्रात संशोधन तसेच विकास कार्यात वाढ करण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
16 SEP 2022 8:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 14 सप्टेंबर 2022 रोजी विशेष प्रकारचे धागे, संमिश्र, शाश्वत वस्त्रे, मोबिलटेक, स्पोर्टेक आणि जिओटेक प्रकारच्या वस्त्रांच्या निर्मितीसाठी 60 कोटी रुपये खर्चाच्या 23 धोरणात्मक संशोधन प्रकल्पांना मंजुरी दिली. राष्ट्रीय तंत्रज्ञान निगडित वस्त्रप्रावरणे अभियान या सरकारच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाअंतर्गत या धोरणात्मक संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या 23 संशोधन प्रकल्पांपैकी मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये कृषी, स्मार्ट वस्त्रप्रावरणे, आरोग्यसेवा, धोरणात्मक वापर आणि संरक्षण साधने या क्षेत्रात वापर होणाऱ्या विशेष धाग्यांची निर्मिती करणाऱ्या 12 प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच कृषी आणि आरोग्यसेवा क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या शाश्वत वस्त्रांची निर्मिती करणाऱ्या 4 प्रकल्पांना परवानगी देण्यात आली असून जिओटेक्स्टाईल क्षेत्रातील 5, मोबिलटेक मधील 1 आणि स्पोर्टेकमधील 1 अशा एकूण 23 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
नीती आयोगाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य तसेच मुख्य शास्त्रीय सल्लागार यांनी संबंधित मंत्रालयांशी संपर्क साधून तंत्रज्ञान निगडित वस्त्रांच्या निर्मितीसाठी सूचना दिल्या आहेत. आयआयटीसह प्रमुख भारतीय संस्था, सरकारी संघटना तसेच प्रख्यात उद्योजक यांच्यासह विविध सहभागींनी,भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी, विशेषतः आरोग्यसेवा, औद्योगिक आणि संरक्षणात्मक, उर्जा साठवण, कृषी आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी धोरणात्मक प्रकल्पांना मंजुरी देणाऱ्या या बैठकीत भाग घेतला.
वैज्ञानिक आणि तांत्रिक विषयातील तज्ञांच्या गटाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, “भारतातील तंत्रज्ञान निगडित वस्त्रांच्या वापराच्या क्षेत्रात संशोधन तसेच विकास कार्यात वाढ करण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र एकमेकांशी जोडले जाणे आवश्यक आहे. शिक्षणतज्ञ, वैज्ञानिक आणि संशोधक यांच्या कार्याचे एकत्रीकरण केले जाणे ही आजच्या काळाची गरज आहे.
S.Patil /S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1859917)