कृषी मंत्रालय
आयसीएआर आयोजित करणार कृतज्ञ (KRITAGYA) 3.0, पीक सुधारणेबाबतची राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन
Posted On:
16 SEP 2022 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022
राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद, आपल्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि पीक विज्ञान विभागा अंतर्गत, पीक सुधारणेसाठी वेगवान प्रजननाला प्रोत्साहन देण्यासाठी हॅकाथॉन 3.0 “कृतज्ञ (KRITAGYA)” आयोजित करणार आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन पुढे नेत, हा कार्यक्रम विद्यार्थी/शिक्षक/उद्योजक/नवोन्मेषक आणि इतरांना पीक सुधारणेसाठीच्या नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याकरता नाविन्यपूर्ण पद्धती आणि तंत्रज्ञान उपाय प्रदर्शित करण्याची संधी देईल.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या अशा उपक्रमांमुळे पीक क्षेत्रात, शिकण्याची क्षमता, नवोन्मेष आणि उपाय, रोजगार क्षमता आणि उद्योजकता यासह अपेक्षित जलद परिणामांना चालना मिळेल. यामुळे देशात तंत्रज्ञानावर आधारित उपायांचा अवलंब करायला चालना मिळेल.
कृषी शिक्षण विभागाचे उपमहासंचालक आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे (एनएचईपी) राष्ट्रीय संचालक राकेश चंद्र अग्रवाल, यांच्या मते, कृतज्ञ (KRITAGYA) या शब्दाची व्याख्या अशी आहे: कृषीसाठी KRI म्हणजे शेती, TA म्हणजे तंत्रज्ञान आणि GYA म्हणजे ज्ञान. या स्पर्धेत देशभरातल्या कोणत्याही विद्यापीठ/तंत्रज्ञान संस्थेचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि नवोदित/उद्योजक अर्ज करू शकतात आणि गट म्हणून या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या गटात जास्तीत जास्त 4 सहभागी असतील, ज्यामध्ये एकापेक्षा जास्त प्राध्यापक आणि/किंवा एकापेक्षा जास्त नवोदित किंवा उद्योजक नसतील. सहभागी विद्यार्थ्यांना स्थानिक स्टार्ट-अप, तंत्रज्ञान संस्थांमधील विद्यार्थी यांच्याशी सहयोग करता येईल आणि भारतीय रुपये 5 लाखापर्यंतची रक्कम जिंकता येईल.
नोंदणी आणि सहभाग याबाबतच्या अधिक माहितीसाठी पुढील लिंकला भेट द्यावी: https://nahep.icar.gov.in/Kritagya.aspx
S.Patil /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1859901)
Visitor Counter : 228