ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"इमारतींमधे शून्य कार्बन संक्रमण व्यवस्था" उभारण्याबाबत 'अंगण 2022' या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन


‘उर्जा सक्षम इमारतींसाठीचे तंत्रज्ञान’या विषयावर 15 पेक्षा अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे तज्ञ करतील चर्चा

Posted On: 15 SEP 2022 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2022

इमारतींमधे शून्य कार्बन उत्सर्जन व्यवस्था" उभारण्याबाबत 'अंगण 2022' (पर्यावरणस्नेही अधिवासाद्वारे निसर्ग संवर्धन) या तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला 14 सप्टेंबर 2022 रोजी सुरुवात झाली. या मालिकेतली ही दुसरी परिषद आहे. ऊर्जा मंत्रालयाचे सचिव आलोक कुमार यांनी परिषदेचे उद्घाटन केले. ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अजय तिवारी देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत-स्विस ऊर्जा सक्षम इमारत  प्रकल्पा अंतर्गत (बीप)  स्विस विकास आणि सहकार्य संस्थेच्या (एसडीसी) सहकार्याने ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा कार्यक्षमता कार्यालयाने (बीईई) अंगण 2.0 चे आयोजन केले आहे.

या परिषदेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी 75 मान्यवर व्याख्याते उपस्थित आहेत. यात 15 हून अधिक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी,आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक

डॉ. अजय माथूर आदींचा समावेश आहे. इमारतींचे उर्जा सक्षमीकरण आणि इमारतींमधून कार्बन उत्सर्जन कमी करण्याशी संबंधित मुद्द्यांवर, 8 पूर्ण सत्रे आणि 8 संकल्पना आधारित सत्रांमध्ये चर्चा होईल. या परिषदेला आंतरराष्ट्रीय संस्थांचे मान्यवर उपस्थित आहेत.

परवडणाऱ्या आणि पर्यावरणस्नेही निवासी इमारतींसाठी राष्ट्रीय उर्जा सक्षम आराखडा चळवळ (एनईईआरएमएएन) या बीईईच्या पहिल्या पुरस्कार विजेत्यांना आज गौरवण्यात आले. हे पुरस्कार बीईईच्या पर्यावरण स्नेही-निवास संहिता (ईएनएस) आणि उर्जा संवर्धन इमारत कोडचे (ईसीबीसी) पालन करणाऱ्या इमारतींच्या प्रारुपाला मान्यता देणे, त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने सुरु केले आहेत. 

जम्मू आणि काश्मीर ते अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत देशभरातील प्रकल्पांनी निर्माण (NEERMAN) पुरस्कार स्पर्धेत सहभाग घेतला होता.  वास्तुविशारद, अभियंते, बांधकाम व्यावसायिक, बांधकाम साहित्य उद्योग, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी असे 500 हून अधिक प्रतिनिधी परिषदेला उपस्थित आहेत.

भारताला 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन अर्थात नेट झिरो बनवण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लास्गो येथे कॉप 26 मध्ये जाहीर केले. यात लाईफ (जीवनशैली आणि पर्यावरण) आणि पंचामृत या विषयावर नमूद केलेल्या निकोप परिसंस्थेला प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. 

इमारत क्षेत्रात उपयोगी ठरणारी कमी कार्बन उत्सर्जन करणारी उत्पादने, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे प्रदर्शन परिषदेत भरले आहे.

या परिषदेत " कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या बांधकांमांसाठी निधी उभारणी, "निवासी इमारतीमध्ये उष्ण वातावरणात थंडावा आणि कोणत्याही हवामानात टिकून राहू शकेल असे बांधकाम" यासारख्या गंभीर मुद्यांवर चर्चा झाली. परिषदेत "संसाधन कार्यक्षमतेसंदर्भात महिलांचा सहभाग" या विषयावर विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले.

 

R.Aghor /V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1859650) Visitor Counter : 239