ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधील सुरक्षितता आणि भारतीय राष्ट्रीय इमारत बांधणी संहिता 2016 चा वापर करण्याकरिता मार्गदर्शक सूचनांशी संबंधित पुस्तिका जारी केली
Posted On:
12 SEP 2022 6:38PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नुकत्याच झालेल्या भारतीय मानक मंडळाच्या नियंत्रक मंडळाच्या चौथ्या बैठकीमध्ये “इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधील सुरक्षितता – भारतीय राष्ट्रीय इलेक्ट्रिकल संहितेनुसार सुरक्षिततेसाठी पुढचे पाऊल” या विषयावरील पुस्तिका आणि भारतीय राष्ट्रीय इमारत बांधणी संहिता 2016 चा वापर करण्याकरिता मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या अत्यंत महत्त्वाच्या दोन दस्तावेजांसह, स्वतःचे घर बांधताना किंवा विकासकाकडून खरेदी करताना आपले हक्क आणि कर्तव्ये याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तयार केलेली तीन पत्रके देखील त्यांनी जारी केली.
इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधील सुरक्षिततेबाबतची पुस्तिका भारतीय मानक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय कूपर संघटना यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. वीजविषयक सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण होण्यास या पुस्तिकेची मदत होणार असून त्यात इमारतींमध्ये विजेच्या तारा बसविताना आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन दिले आहे.
याप्रसंगी जारी करण्यात आलेली तीन पत्रके, सामान्यांना सुरक्षित आणि टिकाऊ स्वरुपाची घरे मिळविण्यासाठी केवळ महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून आणि वैधानिक अधिकाऱ्यांकडूनच नव्हे तर अभियंता, वास्तूविशारद, इत्यादींसारख्या बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांकडून सेवा घेताना त्या अधिक उत्तम पद्धतीने कशा घेता येतील याबाबत मार्गदर्शन करतील. ही पत्रके हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली असून त्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत: घरमालकांसाठी मार्गदर्शक तत्वे – मालिका 1 इमारत परवाने प्रक्रिया, घरमालकांसाठी मार्गदर्शक तत्वे – मालिका 2 तुमचे स्वतंत्र घर बांधताना आणि घरमालकांसाठी मार्गदर्शक तत्वे – मालिका 3 विकासक /बांधकाम व्यावसायिकांकडून घर घेताना.
आज जारी करण्यात आलेले दस्तावेज पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:-
घरमालकांसाठी मार्गदर्शक तत्वे
https://www.bis.gov.in/index.php/guide-for-homeowners-and-homebuyers/
भारतीय राष्ट्रीय इमारत बांधणी संहिता सरलीकृत
https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2022/08/Booklet-Guide-for-Using-NBC- 2016.pdf
“इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन मधील सुरक्षितता – भारतीय राष्ट्रीय इलेक्ट्रिकल संहितेनुसार सुरक्षिततेसाठी पुढचे पाऊल ” यासंबंधीची पुस्तिका
https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2022/08/Handbook-_Electrical-safety-_Final.pdf
***
S.Kane/s.Chiitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858762)
Visitor Counter : 179