रेल्वे मंत्रालय
ऑगस्ट 2022 पर्यंत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रेल्वेच्या एकूण महसूलात 38% वाढ
प्रवासी वाहतूक महसूलात 116% वाढ
Posted On:
11 SEP 2022 9:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2022
ऑगस्ट 2022 महिनाअखेरीपर्यंत भारतीय रेल्वेने एकूण 95,486.58 कोटी रुपये महसूल मिळवला आहे.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील महसुलाच्या तुलनेत हा महसूल 26271.29 कोटी म्हणजेच 38% नी जास्त आहे.
रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून 25,276.54 कोटी रुपये एवढा महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या प्रवासी वाहतूक महसुलापेक्षा ही रक्कम 13,574.44 कोटी रुपयांनी म्हणजेच 116 टक्क्यांनी जास्त आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत आरक्षित तसेच अनारक्षित या दोन्ही प्रकारात प्रवासी वाहतूक वाढली आहे. लांब अंतराच्या आरक्षित मेल एक्सप्रेस संदर्भातली वाढ ही त्याच अंतरावरील पॅसेंजर किंवा उपनगरी गाड्यांच्या तुलनेत जास्त आहे.
कोच विषयक इतर महसूल हा 2437.42 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या याच कालखंडातील महसुलापेक्षा हा महसूल 811.82 कोटी रुपयांनी म्हणजेच 50 टक्क्यांनी वाढला आहे.
भारतीय रेल्वेच्या पार्सल क्षेत्रातल्या लक्षणीय वाढीचा यात मोठा वाटा आहे.
माल वाहतुकीतून मिळणारा महसूल यावर्षी ऑगस्ट अखेरीपर्यंत 65,505.02 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत याच प्रकारच्या महसुलाच्या तुलनेत त्यात 10,780.03 कोटी रुपयांनी म्हणजेच 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धान्य, खते, सिमेंट, खनिज तेल , कंटेनर वाहतूक आणि इतर मालाच्या वाहतुकीने त्याचबरोबर कोळसा वाहतुकीनेही या वाढीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
इतर प्रकारचा महसूल सुद्धा 2267.60 कोटी रुपये झाला आहे. म्हणजेच त्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील महसुलापेक्षा 1105 कोटी रुपये म्हणजेच 95% नी वाढ झाली आहे.
रेल्वे महसुलाची ऑगस्ट 2022 पर्यंतची महसुलाची थोडक्यात आकडेवारी पुढील प्रमाणे:
|
|
|
Rs in Cr
|
Category
|
Actual
2021-22
|
Actual
|
Actual
|
Variation over last year
|
Upto Aug 21
|
Upto Aug 22
|
Amount
|
%
|
Passenger Revenue
|
39214.38
|
11702.10
|
25276.54
|
13574.44
|
116%
|
Other Coaching Revenue
|
4899.55
|
1625.60
|
2437.42
|
811.82
|
50%
|
Goods Revenue
|
141096.39
|
54724.99
|
65505.02
|
10780.03
|
20%
|
Sundry Revenue
|
6067.97
|
1162.60
|
2267.60
|
1105.00
|
95%
|
Total Revenue
|
191278.29
|
69215.29
|
95486.58
|
26271.29
|
38%
|
* * *
N.Chitale/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858564)