वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जगभरातील भारतीय समुदाय यांच्यातील भागीदारी, भारताचा विकसित राष्ट्र होण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने जलद मार्गी लावण्यासाठी मदत करेल - पीयूष गोयल


टियर 2 आणि 3 शहरे तसेच दुर्गम भागात स्टार्ट अप्सना मार्गदर्शन व समर्थन देण्यासाठी पालो अल्टोमध्ये SETU सुरू केले -पीयूष गोयल

गुंतवणुक आणि व्यापार प्रोत्साहन संस्था यांच्यातील समन्वय भारताच्या प्रसारात लक्षणीय बदल घडवून आणेल - पीयूष गोयल

Posted On: 11 SEP 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री,  पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, भारत आणि जगभरातील भारतीय समुदाय यांच्यातील भागीदारीमुळे भारताचा विकसित राष्ट्र होण्याचा प्रवास जलद मार्गी लावण्यास खरोखर मदत होईल. अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज ते लॉस एंजेलिसमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

अमेरिकेमध्ये त्यांनी भारतीय समुदायातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांशी केलेल्या संवादाबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि अनेक सूचना केल्या ज्या वैचारिकदृष्ट्या महत्त्वाच्या होत्या.  गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, ते आपल्या मातृभूमीला परत देण्याच्या आपल्या कर्तव्याच्या भावनेने भारताच्या विकास गाथेमधील भागधारक असतील. भारतीय समुदायातले सदस्य सामान्यतः त्यांच्या निवडलेल्या व्यवसायात खूप यशस्वी असतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अमेरिकेच्या लोकांमध्ये आणि अर्थव्यवस्थेत आपला ठसा उमटवला आहे, असे ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001X2IE.jpg

एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री म्हणाले की, अमेरिकेतील विचार आणि उद्योजकांना भारतातील भागधारकांशी जोडण्यासाठी सरकार काही भूमिका निभावू शकते का याविषयी त्यांनी अनेक सूचना केल्या. यावर मंत्र्यांनी स्पष्ट केले की, भारताकडे आधीपासूनच दोन उपक्रम आहेत, 'इन्व्हेस्ट इंडिया' जो जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करतो आणि एक स्टार्ट अप इंडिया समूह जो भारतातील स्टार्ट-अपना समर्थन देतो, त्यांना भारतातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांशी जोडण्यात मदत करतो आणि इन्क्यूबेटर, एक्सीलरेटर, प्रशिक्षण आणि कौशल्य सुविधा स्थापन करण्यात मदत करतो.

वाणिज्य विभागाच्या प्रस्तावित पुनर्रचनेचा संदर्भ देत गोयल म्हणाले की, स्वातंत्र्य आणि स्वायत्ततेच्या काही सकारात्मक बदलांसह भारतात गुंतवणूक वाढावी याकरता व्यापार प्रोत्साहन संस्था स्थापन करण्यावर विचार केला जात आहे. हे एक सुविधा केंद्र म्हणून काम करेल जे भारतातून व्यापाराला चालना देईल, ते म्हणाले, या गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि व्यापार सुविधा संस्था एकत्रितपणे भारताच्या प्रसारामध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0022N8O.jpg

पालो अल्टो-सेटूमध्ये(SETU) त्यांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अप उपक्रमात प्रचंड क्षमता असल्याचे निदर्शनास आणून देताना, मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, या कल्पनेने सर्व क्षेत्रांत वाव मिळविला की, टियर 2 आणि 3 शहरे आणि दुर्गम भागामध्येही स्टार्ट-अपला मार्गदर्शन आणि समर्थन करण्यास मदत होईल. सामान्य माणसाचे जीवन सुकर करण्यासाठी विविध कल्पना असलेले अनेक तरुण आपल्याकडे आहेत. मला खात्री आहे की, हा SETU उद्योजक आणि कल्पनांना गुंतवणूकदारांशी जोडून त्यांना मदत करेल, असे ते म्हणाले.

आदल्या दिवशी त्यांनी लॉस एंजेलिस येथील श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील व्यापारी समुदायाशी संवाद साधला.

सॅन फ्रान्सिस्कोमधील व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीने मंत्र्यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्याचा समारोप केला.

“डिजिटायझेशन भारताच्या विकासाला कसे सामर्थ्यवान बनवत आहे यावर प्रकाश टाकला. भारताचा विकास आणि प्रगती याबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यांना या परिवर्तनीय प्रवासात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले”, असे त्यांनी ट्विट केले.

व्हेंचर कॅपिटलिस्ट आणि सिंग्युलॅरिटी युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींसोबतच्या बैठकीने माझ्या यूएस भेटीचा समारोप केला.

भारताचा विकास आणि प्रगती याबाबत त्यांना माहिती दिली आणि त्यांना या परिवर्तनीय प्रवासात भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले.

 

* * *

S.Pophale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1858483) Visitor Counter : 155