वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी बळकट  करण्यासाठी भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश इच्छुक : पियूष गोयल


भारताच्या विकासगाथेने उपलब्ध करून दिलेल्या  संधीचा लाभ घेण्याचे अनिवासी भारतीयांना आवाहन

‘कर्तव्य पथ’ चे उद्घाटन तरुण भारताच्या वाढत्या आकांक्षा दर्शवते : गोयल

गोयल यांनी लॉस एंजेलिसमध्ये अमेरिका -भारत धोरणात्मक मंचाला केले संबोधित

Posted On: 10 SEP 2022 6:40PM by PIB Mumbai

 

भारत आणि अमेरिका या उभय  देशांनी आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी बळकट  करण्याच्या दिशेनं काम करत राहण्यासाठी इच्छुक आहेत असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले लॉस एंजेलिसमध्ये अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी मंचाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.

भारत सरकार आणि अमेरिकी  सरकार या दोघांनाही आर्थिक संबंध आणि धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याची इच्छा आहे आणि अमेरिकेमधील  लोकांशी असलेले मजबूत संबंध व्यवसाय आणि सरकारच्याही  खूप वेगाने पलीकडे जातील, असेही  गोयल यांनी सांगितले.

भारतात घडत असलेल्या विकासगाथेचा दाखला देत, या वर्षी दोन मुक्त व्यापार करारांना (एफटीए) यापूर्वीच  अंतिम स्वरूप देण्यात आले आहे, हे नमूद करत या वर्षाच्या अखेरीस आणखी किमान दोन मुक्त व्यापार करार पूर्ण होण्याची आशा गोयल व्यक्त केली.

भारत जगभरातील देशांसोबत आंतरराष्ट्रीय संबंध वाढवत आहे, याचा पुनरुच्चार करत, गोयल यांनी नमूद केले की, अमेरिके सारख्या देशांमध्ये राहून, काम करून आणि लाभ मिळवून आंतरराष्ट्रीय सहभागाचे महत्त्व आमचे अनिवासी भारतीय जाणतात.

जगभरातील 30 लाख अनिवासी भारतीयांसह कार्यरत आणि अमेरिका आणि युरोप सारख्या मैत्रीपूर्ण देशांसोबत काम करत असल्यामुळे इतिहासाची वाटचाल लक्षणीयरीत्या बदलू शकते, यावर मंत्र्यांनी भर दिला.

पुढील 25-30 वर्षात भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे याचा पुनरुच्चार करूनभारताच्या विकासगाथेने निर्माण केलेल्या  संधीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी अनिवासी भारतीयांना केले.

कर्तव्य पथचे उद्घाटन तरुण भारताच्या वाढत्या आकांक्षा यथायोग्य प्रतिबिंबित करते आणि  जो भारत कर्तव्याचा मार्ग आणि जीवनात मोठ्या गोष्टींची आकांक्षा या दोन्हींचा अवलंब करतो तो  उद्याचा भारत भारत जगाला दाखवते., असे त्यांती सांगितले. 

स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करत असताना पुढील 25 वर्षात विकसित आणि समृद्ध भारतासाठीचे  आपले स्वप्न  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगले आहे. याचा पाया घालण्यात आला असून बांधणी करण्यात आली असल्याचे त्यांनी  सांगितले.

सर्वांना अमृत काळाचा  एक भाग होण्याचे आवाहन करत हा भारताचा समृद्ध देशाकडे प्रवास आहे,असे सांगत गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या प्रयत्नांनी आणि 130 कोटी भारतीयांच्या प्रयत्नांनी, कर्तव्याच्या मार्गाचा अवलंब करताना मोठ्या उद्दिष्टांची आकांक्षा असलेला नवा भारत जगाला दिसेल.

***

A.Chavan/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858325) Visitor Counter : 107


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil