संरक्षण मंत्रालय
हवाई योद्ध्यांसाठी आर्थिक सुजाणता आणि जागरूकता या विषयावर परिसंवाद
Posted On:
10 SEP 2022 2:32PM by PIB Mumbai
वैयक्तिक आघाडीवर आर्थिक नियोजनाच्या सूक्ष्म पैलूंबद्दल सर्व हवाई योद्ध्यांना शिक्षित आणि परिचित करण्याचा प्रयत्न म्हणून, भारतीय हवाई दलाने 09 सप्टेंबर 2022 रोजी सर्व संबंधित चालू आर्थिक विषयांवर आधारित दिवसभर एका परिसंवादाचे आयोजन केले होते. नवी दिल्लीतील हवाई दलाच्या प्रेक्षागृहात रिझर्व्ह बँकेच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाने "हवाई योद्धांसाठी आर्थिक सुजाणता आणि जागरूकता" हा परिसंवाद आयोजित केला होता.
हवाई योद्धांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात योग्य आणि माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवण्याचा या परिसंवादाचा प्रयत्न होता. या परिसंवादात रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक जागरूकता, बँक फसवणूक, लोकपालांची भूमिका इत्यादी विविध विषयांवर चर्चा केली.भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी आणि वित्तीय क्षेत्रातले व्यावसायिकही या परिसंवादात सहभागी झाले होते. यामुळे हवाई योध्यांना विविध अनेक पैलू जाणून घेण्याची संधी मिळाली.
या परिसंवादात सर्व श्रेणीतील सुमारे 400 हवाई योद्धे सहभागी झाले होते. जास्तीत जास्त ठिकाणी हा परिसंवाद पोहोचावा हे सुनिश्चित करण्यासाठी हवाई दलाचे सर्व विभाग आणि तुकड्यांमध्ये परिसंवादाचे थेट-प्रसारण करण्यात आले होते.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1858293)
Visitor Counter : 180