गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे फिट इंडिया फ्रीडम रायडर बाइकर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

Posted On: 09 SEP 2022 5:49PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमात, 10 महिलांसह 120 जण 75 मोटरसायकलवरून 75 दिवसांच्या भारत भ्रमंतीवर निघाले आहेत. हे मोटरसायकलस्वार सहा आंतरराष्ट्रीय सीमांसह 34 राज्य और केंद्रशासित प्रदेशांमध्ये जातील आणि 75 दिवसांमध्ये 18000 किलोमीटरचा मोठा प्रवास करून देशातील 75 महत्वपूर्ण ठिकाणी स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा प्रचार करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ वर्षांत भारत जगातील 11 व्या क्रमांकावरील अर्थव्यवस्थेवरून  5 वी सर्वात मोठी जागतिक अर्थव्यवस्था बनला आहे. जेव्हा 130 कोटी लोक देशभक्तीच्या भावनेने आपले घटनात्मक कर्तव्य बजावतात, तेव्हा देशाची प्रगती  कोणीही रोखू शकत नाही.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत फिट इंडिया फ्रीडम रायडर बाइकर रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. गृह आणि क्रीडा तसेच युवा व्यवहार राज्यमंत्री  निशीथ प्रामाणिक आणि सांस्कृतिक आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री  मीनाक्षी लेखी  यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह  म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सव साजरा करत आहे आणि पंतप्रधानांनी हा अमृत महोत्सव स्वातंत्र्याशी जोडला आहेच त्याचबरोबर  तो बहुआयामीही बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  हा जो अमृत काळ ठरवला आहे, तो प्रत्येक भारतीयाच्या मनात एक नवीन चैतन्य आणि उत्साह निर्माण करत आहे, आणि जेव्हा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा होईल, त्या वेळी भारत प्रत्येक क्षेत्रात अव्वल स्थानी  असेल. हे लक्ष्य घेऊन 130 कोटी देशवासीय भारताला अग्रेसर बनवण्याच्या प्रवासाला निघाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 'हर घर तिरंगा' अभियानादरम्यान देशभक्तीची जी लाट दिसून  आली , ती क्वचितच अन्य कोणत्याही देशाने अनुभवली असेल.प्रत्येक घरावर, वाहनावर, स्मारकावर तिरंगा फडकवण्यात आला होता आणि तिरंगा फडकवून लोक अभिमानाने त्यांचे फोटो अपलोड करत होते. यातून  लोकांच्या मनात राष्ट्राप्रती असलेले प्रेम आणि देशभक्ती दिसून येते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून आज 10 महिलांसह 120 जण 75 दुचाकींवरून  देशाच्या  75 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत.हे दुचाकीस्वार सहा आंतरराष्ट्रीय सीमांसह  34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून प्रवास करतील, 250  हून अधिक जिल्ह्यांचा प्रवास करतील आणि 18,000  किमीचा प्रवास 75  दिवसांत पूर्ण करून , स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाचा  75  महत्त्वाच्या ठिकाणी प्रचार करतील आणि राष्ट्रीय राजधानीत परततील.राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरेल.तरुणांना फिट इंडियाचा संदेश देण्यासाठीही  हा प्रवास यशस्वी होईल.'फ्रीडम मोटार रायडर्सविविधतेतील एकतेचा संदेश देशात घेऊन जातील आणि राज्य किंवा शहरांमध्ये दुचाकीच्या छोट्या रॅली काढून तरुणांशी जोडले जातील.हजारो तरुणांना या कार्यक्रमाशी जोडण्याचा हा स्तुत्य प्रयत्न  आहे.24 नोव्हेंबरला ते दिल्लीला परतल्यावर तरुणांपर्यंत एक नवी ऊर्जा नक्कीच पोहोचेल.18,000 किलोमीटरचा प्रवास करून, वेगवेगळ्या भाषा, खाद्यपदार्थ आणि पोशाख  यांच्याशी जोडले जाऊन  देश जाणून घेतल्यानंतर  या सर्व दुचाकीस्वारांचे  आयुष्यही बदलणार आहे. 18,000 किमीचा प्रवास  हा अनाम शहीद वीरांची अमर गाथा पुनर्जीवित करेल आणि तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करेल, असे अमित शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा आणि ऊर्जा मिळाली असून, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही अशा अनेक क्षेत्रांमध्ये  गेल्या आठ वर्षांत देशाने प्रगती केली आहे. आठ वर्षांपूर्वी भारत ही जगातली 11वी अर्थव्यवस्था होती आणि आज गेल्या आठ वर्षांत 11व्या स्थानावरून 5वी मोठी जागतिक अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान भारताला मिळाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी दाखवलेला  मार्ग आणि देशाच्या प्रगतीसाठी वाटचालीचा त्यांचा मार्ग  स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात आपल्याला जगातील सर्वोच्च स्थानावर नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

***

N.Chitale/S.Kane/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1858085) Visitor Counter : 157