ग्रामीण विकास मंत्रालय
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान दुर्लक्षित कुटुंबांना या योजनेच्या कक्षेत आणण्यासाठी सामाजिक एकत्रीकरण मोहिमेचे आयोजन करत असते
दि. 7 सप्टेंबर 2022 पासून या 15 दिवसांच्या देशव्यापी मोहिमेला आरंभ होत आहे
प्रविष्टि तिथि:
09 SEP 2022 3:01PM by PIB Mumbai
देशातील विविध 34 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील दुर्लक्षित ग्रामीण गरीब कुटुंबातील महिलांना दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान(DAY-NRLM) यात महिला बचत गटांमार्फत (SHGs) एकत्र आणण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय दिनांक 7 ते 20 सप्टेंबर, 2022 या कालावधीत 15 दिवसांच्या देशव्यापी मोहीमेचे आयोजन करत आहे,
या मोहिमेदरम्यान, प्रत्येक गावातील महिला संस्था सामाजिक एकत्रीकरणासाठी कार्यक्रम आयोजित करतील, ज्यासाठी त्या महिला प्रत्येकी एक सदस्य, एक मैत्रीण किंवा शेजारी जे स्वमदत गटाचे(SHG) सदस्य नाहीत अशा महिलांना त्यांच्यासोबत घेऊन येतील.
दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान(DAY-NRLM) याचा भाग होण्याचे लाभ अधोरेखित करत,सदस्य नसलेल्यांना,अशा प्रकारे त्यात सामील होण्यास प्रवृत्त करून,त्यांना सामुदायिक संस्थांशी जोडले जाईल.दुर्गम भागातील ग्रामपंचायतींमधील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरातील तालुका स्तरावरील (ब्लॉक लेव्हल) कर्मचार्यांकडून या उपक्रमाकरीता विशेष रणनीती देखील तयार केली जात आहे.
स्वयंसहाय्यता गटांना टायर टू लेव्हल ऑर्गनायझेशन (VOs) आणि टायर थ्री लेव्हल क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLFs), अशा उच्चस्तरीय फेडरेशनमध्ये समाविष्ट केले जावे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
गरीबांच्या समुदाय-व्यवस्थापित संस्थांमध्ये अशा संघटित संरचना विकसित होतील ज्या उपजीविका आणि सामाजिक विकासाच्या कार्यक्रमांचे नेतृत्व करू शकतील,हा मंत्रालयाचा यामागील दृष्टीकोन आहे. सर्व स्वमदत गट, स्वयंसेवी संस्था, क्लस्टर फेडरेशन (SHG, VO आणि CLF) स्थापन झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांची बँकांमधून खाती उघडण्यात येतील.
या मोहिमेची घोषणा दिनांक 5 सप्टेंबर रोजी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा यांनी केली होती. दिनांक 31 ऑगस्टपर्यंत, 8.5 कोटींहून अधिक कुटुंबे दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान(DAY-NRLM) याअंतर्गत 78.33 लाख स्वमदत गटांशी जोडली गेली आहेत.
***
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1858017)
आगंतुक पटल : 342