कृषी मंत्रालय

कृषी क्षेत्रात सार्वजनिक - खाजगी भागीदारी प्रकल्प आकर्षित करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच फिक्की यांच्या संयुक्त उपक्रमाचा प्रारंभ

Posted On: 08 SEP 2022 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे कृषी क्षेत्रात खाजगी- सार्वजनिक भागीदारी तत्वावर आधारित प्रकल्प व्यवस्थापन एककाचा आरंभ केला. यावेळी बोलताना तोमर यांनी कृषीक्षेत्राला बळकटी आणण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केले, त्यामुळे इतर क्षेत्रेही मजबूत होतील असे ते म्हणाले. खाजगी- सार्वजनिक भागीदारी हे शेतीच्या विकासासाठी आदर्श मॉडेल आहे आणि खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वांवरील प्रकल्पांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या माध्यमातून त्यांना  लाभ पोहोचवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असेही ते म्हणाले.

देशासाठी तसेच समाजासाठी कृषीक्षेत्राचे सक्षमीकरण आवश्यक आहे असे तोमर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या आठ वर्षांच्या कार्यकाळात 1,500 हून अधिक कालबाह्य कायदे मोडीत काढून व्यवस्थेचे सुलभीकरण करत सामान्य माणसाचे जीवन सुलभ केले आहे असे तोमर म्हणाले.

व्यापार आणि उद्योग क्षेत्र मजबूत आणि संघटीत आहे. त्यांना सर्व साधने उपलब्ध आहेत ती कृषीक्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देऊ शकतील. कृषीसंबधित पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींचा निधी, 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (FPO)    स्थापना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने पावले उचलत आहे. शेतकरी संघटनांच्या स्थापनेसाठी, त्यांना मजबूती देण्यासाठी तसेच शेतकऱ्याना नवनवीन तंत्रज्ञानाशी  परिचय  करुन घेता यावा, शेतीतून लाभदायक उत्पन्न आणि जागतिक दर्जाचे उत्पादन घेता यावे यासाठी  सरकारचे प्रयत्न जारी आहेत. सरकारच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत असून  त्याचे सुपरिणाम आपल्याला दिसत आहेत, असे तोमर यांनी सांगितले.

N.Chitale /V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1857883) Visitor Counter : 162