वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परदेशातील भारतीय समुदायाने 1.3 अब्ज लोकसंख्या असलेल्या आकांक्षी बाजारपेठेच्या भारताने देऊ केलेल्या प्रचंड व्यावसायिक संधी जगापर्यंत पोचवण्याचे गोयल यांचे आवाहन

Posted On: 08 SEP 2022 9:07AM by PIB Mumbai

अमेरिकेतील भारतीय समुदायाचा दृष्टीकोन अतिशय व्यावसायिक आणि नाविन्यपूर्ण आहे. त्याचवेळी भारतीय संस्कृती आणि मूल्यांशी मजबूत सांधा त्यांनी कायम ठेवला आहे. अशा प्रकारे त्यांच्यातील भारतीयत्व जिवंत राखले आहे असे वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज म्हटले आहे.

सॅन फ्रान्सिस्को येथे ‘भारतीय समुदाया’ सोबतच्या मध्यान्हभोज संम्मेलनात ते बोलत होते.


भारत आणि परदेशातील दुवा म्हणून काम करणाऱ्या भारतीय समुदायाचे अनोखे महत्व अधोरेखित करत गोयल यांनी, त्यांना 1.3 अब्ज आकांक्षी बाजारपेठ असलेला भारत देऊ करत असलेल्या प्रचंड व्यावसायिक संधींबद्दलची माहिती जगापर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.


सरकार भारतीय स्टार्ट अप आणि अमेरिकेतील गुंतवणूकदार यांच्यात सुत्रधाराची भूमिका बजावत आहे. हा संवाद नवीन पातळीवर नेण्यासाठी एकमेकांशी जोडण्याचे आवाहन त्यांनी भारतीय समुदायला केले. येथील गुंतवणूकदारांकडून काही संकल्पना जाणून घेत आहोत, ज्यामुळे भारतात नवीन नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या भांडवलाच्या उपयोजनाला आणखी गती मिळण्यास मदत होईल असे गोयल म्हणाले.

केन्द्र सरकारच्या कार्यपद्धतीत झालेल्या परिवर्तनाबाबत गोयल म्हणाले की, आम्ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या लाल फिताशाहीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहोत. नव्या कार्यपद्धतींमुळे तंत्रज्ञान आणि पारदर्शकतेला मोठ्या प्रमाणावर वाव मिळतो, व्यवस्थेत प्रामाणिकपणा येतो, असेही ते म्हणाले. केन्द्र सरकार व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या प्रत्येक संधीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारचा दृष्टीकोन लोकांशी अधिक सक्रिय सहभागावर आधारित आहे, अधिक प्रमाणात धोरण निश्चितता आणि योग्य अंदाज आणि नियामक प्रक्रियेची सांगड विकसित अर्थव्यवस्थांमध्ये काय घडत आहे याच्याशी घालण्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

भारतभर विशेषतः दुर्गम भागात चांगल्या पायाभूत सुविधा पुरवण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याबद्दल बोलताना गोयल यांनी सांगितले की, उर्वरित 25,000 दुर्गम गावांमध्ये नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळाने घेतला. निर्यातीबाबत गोयल म्हणाले की, भारताने गेल्या आर्थिक वर्षात 675 अब्ज अमेरीकी डॉलर्सची आतापर्यंतची सर्वोच्च वस्तू आणि सेवा निर्यात गाठली आहे आणि या वर्षी आम्हाला 750 अब्ज अमेरीकी डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची आशा आहे.

 

आपण 2047 मधे भारताच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करणार आहोत. हा अमृतकाल आहे. एक विकसित राष्ट्र बनण्याच्या आणि भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समृद्ध करण्याच्या प्रवासाचा हा निर्णायक काळ असणार आहे. या प्रवासात परदेशातील भारतीय समुदायाची खूप महत्त्वाची भूमिका ठरणार आहे, कारण ते प्रतिभा, नवीन कल्पना आणि नवकल्पना यांचे मूल्य जाणतात, ते मार्गदर्शन करतात आणि आर्थिक मदतही करतात.  भारतीय समुदायाकडून भारत आणि अमेरीका यांच्यात व्यवसाय आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी सतत प्रयत्न आणि सहभागाची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

***


Gopal C/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1857733) Visitor Counter : 184