सांस्कृतिक मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत इंडिया गेटजवळील कमानीखालील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट पुतळ्याचे करणार अनावरण

Posted On: 07 SEP 2022 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतील इंडिया गेटजवळ करण्यात येणार आहे. जेट ब्लॅक ग्रॅनाइटचा एकूण 28 फूट उंचीचा  हा पुतळा इंडिया गेटजवळील कॅनोपीखाली स्थापित केला जाईल.

नेताजींच्या भव्य पुतळ्याचे शिल्प 280 मेट्रिक टन वजनाच्या ग्रॅनाइटच्या एकसंध पाषाणातून ( मोनोलिथिक ब्लॉकमधून) साकार करण्यात आले आहे. 26,000 मनुष्य तासांच्या तीव्र कलात्मक प्रयत्नांनंतर, 65 मेट्रिक टन वजनाची ही मूर्ती तयार करण्यासाठी ग्रॅनाइट मोनोलिथला वापरले आहे. पारंपरिक तंत्र आणि आधुनिक साधनांचा वापर करून ही मूर्ती पूर्णपणे हाताने तयार केलेली आहे. पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांच्या पथकाचे नेतृत्व अरुण योगीराज यांनी केले आहे.

नेताजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस (23 जानेवारी) रोजी नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण जिथे झाले त्याच ठिकाणी या पुतळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण होणार आहे. नेताजींचा 28 फूट उंच पुतळा हा भारतातील सर्वात उंच, वास्तववादी, अखंड, हस्तनिर्मित शिल्पांपैकी एक आहे. 21 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधानांनी आश्वासन दिले होते की, देशाच्या नेताजींप्रती असलेल्या ऋणाचे प्रतीक म्हणून इंडिया गेटवर नेताजींचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे.

या पुतळ्यासाठी लागलेला ( एकसंध (मोनोलिथिक) ग्रॅनाइट दगड तेलंगणातील खम्ममहून नवी दिल्लीत आणण्यात आला. या 1665 किलोमीटरच्या प्रवासासाठी 140 चाकांसह 100 फूट लांबीचा खास ट्रक तयार करण्यात आला होता.

नेताजींच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी कॅनोपी येथे इंडिया गेट जवळ पंतप्रधानांचे स्वागत पारंपरिक मणिपुरी शंख वाद्यम आणि केरळचे पारंपरिक पंच वद्यम आणि चंदा यांनी केले जाईल. कदम कदम बढाये जा या पारंपरिक गाण्याच्या सुरात साथ दिली जाईल.

एक भारत - श्रेष्ठ भारत आणि विविधतेतील एकता या भावनेचे प्रदर्शन करण्यासाठी देशाच्या सर्व भागातून 500 नर्तकांचा सांस्कृतिक महोत्सव कर्तव्य मार्गावर सादर केला जाईल. त्याचीच झलक पंतप्रधानांना इंडिया गेटजवळील पायऱ्या पायऱ्यांच्या खुल्या मंचावर ( स्टेप अॅम्फी थिएटरवर) सुमारे ३० कलाकार दाखवतील. लाइव्ह संगीतासह नाशिक ढोल ताशा पथक, संबळपुरी, पंथी, कालबेलिया, करगम आणि डमी घोडे या आदिवासी लोककला प्रकार सादर करतील. मंगलगान ही पद्मभूषण डीड श्रीकृष्ण रतंजनकर  यांनी 1947 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर लिहिलेली कविता पं. सुहास व्यास गायक आणि संगीतकारांच्या पथकासह सादर करतील. आशिष केसकर हे या सादरीकरणाचे संगीत दिग्दर्शक असतील.

8 सप्टेंबर 2022 रोजी रात्री 08.45 वाजता मुख्य सोहळ्यानंतर कर्तव्य मार्गावरील महोत्सव सुरू होईल आणि तो 9, 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7.00 ते 9.00 पर्यंत सुरू राहील.

नेताजींच्या जीवनावरील विशेष 10 मिनिटांचा ड्रोन शो 9, 10 आणि 11 सप्टेंबर 2022 रोजी इंडिया गेट येथे रात्री 08.00 वाजता प्रक्षेपित केला जाईल. सांस्कृतिक महोत्सव आणि ड्रोन शो दोन्ही विनामूल्य प्रवेशासह लोकांसाठी खुले असतील.

 

G.Chippalkatti /P.Jambhekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1857639) Visitor Counter : 199