सहकार मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राज्य सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे करणार उद्घाटन


ही परिषद चर्चा आणि समन्वयाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यायोग्य धोरण/नियोजन संबंधी रूपरेषा तयार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देईल

Posted On: 06 SEP 2022 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 सप्‍टेंबर 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्रीअमित शाह 8 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे राज्य सहकार मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.  केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांच्यासह 36 राज्ये  आणि केंद्रशासित प्रदेशांचे सहकार मंत्री आणि अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सहकार निबंधक आणि प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. 

'सहकार से समृद्धी' या भावनेने सहकाराशी संबंधित लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी.पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत. ही संकल्पना प्रत्यक्षात  साकारण्यासाठी  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली 6 जुलै 2021 रोजी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या कुशल  नेतृत्वाखाली सहकार मंत्रालय सहकार क्षेत्राच्या विकासाला नवीन गती देण्यासाठी, ते बळकट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी निरंतर  काम करत आहे. ही परिषद अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा आणि समन्वयाच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यायोग्य धोरण/नियोजन संबंधी रूपरेषा तयार करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देईल  

यात सहकार समित्यांचे संपूर्ण  जीवन चक्र तसेच त्यांचा  व्यवसाय आणि परिचालन संबंधी सर्व पैलूंचाही समावेश असेल:

  1. धोरणात्मक बाबी
    • राष्ट्रीय सहकार धोरण
    • राष्ट्रीय सहकार डेटाबेस
  2. नवीन प्रस्तावित योजना
    • प्रत्येक  पंचायतीत  पैक्स (PACS)
    • कृषि आधारित आणि  अन्य उत्पादनांची निर्यात
    • सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन आणि  विपणन
    • सहकाराचा नव्या क्षेत्रांमध्ये  विस्तार
  3. पैक्स आणि आदर्श पोट -कायद्यांसंबंधी विषय
    • पैक्सचे (प्राथमिक कृषी पत संस्था )संगणकीकरण
    • सक्रिय नसलेल्या पैक्सच्या  पुनरुज्जीवनासाठी कृती योजना
    • पैक्सचे आदर्श पोटकायदे
    • राज्य सहकार कायद्यांमध्ये  एकरूपता आणणे
  4. प्राथमिक सहकार समित्या
    • दीर्घकालीन वित्तपुरवठ्याला प्राधान्य
    • दुग्ध सहकारी समित्या
    • मत्स्य सहकारी समित्या

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1857249) Visitor Counter : 342