आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ‘स्वस्थ सबल भारत’ परिषदेचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
Posted On:
03 SEP 2022 5:28PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ मनसुख मांडविया, यांनी आज येथे सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांच्या उपस्थितीत ‘स्वस्थ सबल भारत’ परिषदेचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले. भारतातील देह -अवयव-नेत्रदानाच्या सद्यस्थितीवर चर्चा करणे आणि भविष्यात उदभवणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधणे हा या परिषदेचा उद्देश होता.
उपस्थितांना संबोधित करताना, सुरुवातीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी या परिषदेमागील उदात्त हेतूचे कौतुक केले. ते म्हणाले की "आपल्या सांस्कृतिक परंपरेत आपण केवळ आपल्याच नव्हे तर इतरांच्या फायद्याचा विचार करतो आणि अवयवदानाचा मुद्दा अशा दृष्टीकोनाशी सुसंगत आहे."


केंद्रीय मंत्र्यांनी मानवतेसाठी अवयव दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी “जन भागीदारी” आणि लोक चळवळीवर भर दिला. “एकट्या सरकार किंवा स्वयंसेवी संस्थांना अवयवदानाबाबत लोकांना पटवून सांगणे शक्य नाही. अशी मोहीम यशस्वी होण्यासाठी ती लोकचळवळ झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
देह अवयव-नेत्रदान या राष्ट्रीय लोक-प्रणित चळवळीत, प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. मांडविया यांनी केले. "अवयव दानाच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे", असे ते म्हणाले.
***
S.Kane/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856530)
Visitor Counter : 146