इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

जुलै 2022 मध्ये झाले 152.5 कोटी आधार प्रमाणीकरण


जुलै 2022 मध्ये झाले 22.84 कोटी ई- केवायसी व्यवहार

Posted On: 02 SEP 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर 2022

 

संपूर्ण देशामध्ये जुलै 2022च्या अखेरीपर्यंत  आधार नोंदणी, वापर आणि स्वीकारण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. जुलै 2022 पर्यंत 134.11 कोटींपेक्षा जास्त आधार क्रमांक तयार करण्यात आले आहेत.

देशातल्या नागरिकांनी 1.47 कोटी आधार  जुलै महिन्यात यशस्वीपणे अद्ययावत केले आणि 63. 55 कोटी आधार क्रमांक असलेल्या नागरिकांच्या विनंतीनुसार अद्ययावत करण्यात आले आहेत. हे अद्ययावतीकरण डेमोग्राफिक त्याचबरोबर बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाशी देखील संबंधित होते आणि त्यासाठी प्रत्यक्ष आधार केंद्रांवर तसेच ऑनलाइन विनंती करण्यात आल्या होत्या. बायोमेट्रिक विषयक माहिती अद्ययावत करण्यात आली.

आधारद्वारे जुलैमध्ये 152.5 कोटी प्रमाणीकरणाचे व्यवहार करण्यात आले. यापैकी बहुतांश व्यवहार बोटांचे ठसे घेवून बायोमेट्रिक प्रमाणीकरण (122.57कोटी) वापरून केले आहेत. त्या खालोखाल भौगोलिक प्रमाणिककरणाचा वापर केला गेला.

जुलै 2022 अखेरपर्यंत आधार प्रमाणीकरणांची एकूण संख्या  7855.24 कोटी झाली आहे. जूनच्या अखेरीस ही एकूण संख्या 7702.74 कोटी होती.

जुलैमध्ये 53 लाखांपेक्षा जास्त आधार कार्ड तयार करण्यात आली. त्यापैकी बहुतांश कार्ड 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या (0 ते 18 वयोगटातील) मुलांची आहेत. प्रौढ नागरिकांमध्ये आधार संपृक्तता पातळी कायम आहे. ही पातळी 93.41 टक्के आहे. कमीत कमी 26 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये सध्या आधार संपृक्तता 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

जुलैमध्ये आधारव्दारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची संख्या 22.84 कोटी आहे. एकूण ई-केवायसी व्यवहारांची संख्या 1226.39 कोटींवरून वाढून ती आता जुलैमध्ये  1249. 23 कोटी झाली आहे.  ई-केवायसी व्यवहार हे आधार कार्ड धारकाच्या संमतीने केले जातात आणि त्यासाठी प्रत्यक्ष कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता भासत नाही. केवायसी नोंदणीसाठी बरेचवेळा व्यक्तिगत पडताळणी करणे आवश्यक असते.

आधार कार्डाचा वापर करून 1507 कोटींपेक्षा जास्तीचे व्यवहार झाले आहेत. आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (एईपीएस) आणि मायक्रो एटीएम जाळ्यांमुळे हे व्यवहार शक्य झाले आहेत. एकट्या जुलै महिन्यात देशामध्ये 22.37 कोटी एईपीएस व्यवहार झाले आहेत.

नोंद - यूआयडीएआयच्या वतीने एक मासिक पत्रिका सुरू करण्यात येत आहे. यामध्ये आधार कार्डविषयक प्रगती, इतर माहिती अधोरेखित करण्यात येत आहे. याविषयी जाहीर केलेल्या माहितीमधील काही आकडेवारीविषयी नंतर किरकोळ भर घातली जावू शकते, हे प्रसारमाध्यमांनी लक्षात घ्यावे, अशी विनंती आहे. 


* * *

S.Patil/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856421) Visitor Counter : 154