आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 212 कोटी 75 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 4.03 कोटींहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 59,210


गेल्या 24 तासांत देशात 6,168 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रुग्ण बारे होण्याचा दर सध्या 98.68% टक्के

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.51टक्के

Posted On: 02 SEP 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 212 कोटी 75 लाखांचा ((2,12,75,23,421) टप्पा ओलांडला आहे.

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4.03 कोटींहून अधिक (4,03,86,802 ) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याची मोहीम  देखील 10 एप्रिल 2022पासून सुरु करण्यात आली आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,138

2nd Dose

1,01,06,891

Precaution Dose

67,69,496

FLWs

1st Dose

1,84,34,707

2nd Dose

1,76,99,452

Precaution Dose

1,31,77,569

Age Group 12-14 years

1st Dose

4,03,86,802

2nd Dose

3,03,28,731

Age Group 15-18 years

1st Dose

6,17,03,154

2nd Dose

5,23,96,882

Age Group 18-44 years

1st Dose

56,06,35,480

2nd Dose

51,32,78,369

Precaution Dose

6,44,58,188

Age Group 45-59 years

1st Dose

20,39,12,478

2nd Dose

19,63,57,663

Precaution Dose

3,58,97,949

Over 60 years

1st Dose

12,75,87,700

2nd Dose

12,27,35,805

Precaution Dose

4,12,41,967

Precaution Dose

16,15,45,169

Total

2,12,75,23,421

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 59,210 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.13 टक्‍के आहे.

त्यामुळे, भारतातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.68 टक्‍के झाला आहे. गेल्या 24 तासांत 9,685 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले आहेत. देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,55,365 झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 6,168  कोविड रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,18,642  चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 64 लाखांहून अधिक (88,64,66,255) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.51 % आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.94%.इतका नोंदला गेला आहे.

****

Jaydevi PS/R.Aghor/CYadav

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856232) Visitor Counter : 148