गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे "CAPF eAWAS" वेब पोर्टलचे उद्घाटन
Posted On:
01 SEP 2022 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे "CAPF e-AWAS" वेब पोर्टलचे उद्घाटन केले. यावेळी गृहराज्यमंत्री, नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा, केंद्रीय गृह सचिव, सचिव, सीमा व्यवस्थापन आणि विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे महासंचालक आणि एनएसजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे नेहमीच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा मजबूत आधारस्तंभ राहिले आहेत आणि त्यांच्या जवानांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे आणि भारत जागतिक उत्पादन केंद्र बनत आहे आणि अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करणार्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांची यामध्ये मोठी भूमिका आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 35,000 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करताना आपले प्राण गमावले आहेत आणि त्यांच्या बलिदानामुळे नागरिक सुरक्षिततेच्या भावनेने शांत झोपतात. ते म्हणाले की, आज सुरू करण्यात आलेले सीएपीएफ ई-आवास पोर्टल हे त्याच दिशेने आणखी एक पाऊल आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक प्रणाली तयार करण्यात आली आहे ज्याअंतर्गत ज्या जवानांसाठी घरे बांधण्यात आली होती त्यांनाच त्या घरांचा ताबा देण्यात येईल. यामुळे हजारो घरे रिकामी होती. ई-आवास पोर्टलद्वारे यात आता बदल झाला आहे आणि इतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचार्यांसाठी देखील ही रिकामी घरे उपलब्ध होणार आहेत.

अमित शहा म्हणाले की, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल कर्मचार्यांच्या बदल्यात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ट्रान्सफर सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सध्या इंडो-तिबेटियन सीमा पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांनी प्रायोगिक तत्त्वावर हे सॉफ्टवेअर वापरण्यास सुरुवात केली आहे. ई-ट्रान्सफर सॉफ्टवेअर, हे जवानांचे वय आणि तब्येतीनुसार त्यांच्या तैनातीशी निगडित आहे.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856143)
Visitor Counter : 279