संरक्षण मंत्रालय
रशियाच्या पूर्व लष्करी जिल्हा सर्गेयेव्स्की येथे व्होस्टोक- 2022 या युद्धसरावात भारतीय सैन्य दलाचा सहभाग
Posted On:
01 SEP 2022 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2022
01 ते 07 सप्टेंबर 2022 या कालावधीत रशियाच्या पूर्व लष्करी जिल्ह्याच्या प्रशिक्षण मैदानावर व्होस्टोक - 2022 हा बहुपक्षीय धोरणात्मक आणि कमांड युद्धसराव आज सुरू झाला आहे. या सरावाचा उद्देश इतर सहभागी लष्करी तुकड्या आणि निरीक्षकांमध्ये परस्परसंवाद आणि समन्वय साधणे आहे.
7/8 गोरखा रायफल्सच्या तुकड्यांचा समावेश असलेली भारतीय लष्कराची तुकडी सरावाच्या ठिकाणी पोहोचली आहे. पुढील सात दिवसांत संयुक्त क्षेत्रीय प्रशिक्षण सराव, लढाऊ चर्चा आणि अग्निशमन सराव समाविष्ट करण्यासाठी संयुक्त युद्धेसराव हाती घेतले जातील.
भारतीय लष्कराची तुकडी व्यवहारिक पैलू सामायिक करण्यास उत्सुक असेल, चर्चा आणि सामरिक सरावांद्वारे प्रमाणित कवायती, कार्यपद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाचा ती सराव करेल.
* * *
G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1856041)
Visitor Counter : 234