नागरी उड्डाण मंत्रालय

डिसेंबर 2022 पर्यंत कानपूर विमानतळ जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असेल


143.6 कोटी रुपये खर्चाचा सर्वांगीण विकास प्रकल्प सुरू

गर्दीच्या वेळेत 300 प्रवाशांची प्रक्रिया करण्यासाठी नवीन टर्मिनल इमारत सुसज्ज

Posted On: 01 SEP 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 सप्‍टेंबर 2022

 

कानपूर शहर ही उत्तर प्रदेशची व्यापारी राजधानी आणि चामड्याच्या वस्तू, कापड आणि संरक्षण उत्पादनाचे केंद्र आहे. ऐतिहासिक तीर्थक्षेत्रे आणि विविध प्रमुख संस्थांसाठी देखील ओळखले जाणारे, हे शहर मोठ्या संख्येने विमान प्रवाशांना आकर्षित करते. सध्या, कानपूर विमानतळ दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि गोरखपूर या चार शहरांशी थेट जोडलेले आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) प्रवासी वाहतुकीतील वाढ लक्षात घेऊन, कानपूर विमानतळावर 143.6 कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात प्रवाश्यांच्या सुविधेसह सिव्हिल एन्क्लेव्हच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. विकास प्रकल्पामध्ये नवीन टर्मिनल इमारतीचे बांधकाम आणि तीन A-321 प्रकारच्या विमानांच्या पार्किंगसाठी योग्य जागेचा समावेश आहे.

6248 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधलेली, सिव्हिल एन्क्लेव्हची नवीन टर्मिनल इमारतीची रचना गर्दीच्या वेळेत 300 प्रवाशांची प्रक्रिया करण्यासाठी केली जाईल. सर्व आधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज असलेल्या या टर्मिनलमध्ये आठ चेक-इन काउंटर, येणाऱ्या प्रवाशांसाठी कन्व्हेयर बेल्ट असतील. 150 गाड्यांच्या पार्किंगसाठी वाहनतळाचेही नियोजन करण्यात आले आहे. टर्मिनल इमारत ही शाश्वतता वैशिष्ट्यांसह चार-तारांकीत जीआरआयएचए प्रमाणित ऊर्जा सक्षम इमारत असेल. टर्मिनलचा दर्शनी भाग कानपूरच्या प्रसिद्ध जेके मंदिरापासून प्रेरित स्थानिक कला आणि वारसा देखील प्रतिबिंबित करेल. विकास प्रकल्प 31 डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001XQR8.jpg

कानपूर विमानतळाच्या वाढीव क्षमतेसह

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002SBPA.jpg

सिविल एन्क्लेव्हच्या विकासामुळे या शहराचे दळणवळण सुधारेल आणि या क्षेत्राच्या एकूण विकासाला चालना मिळेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003O1RX.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004RSOI.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005X0JO.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006D5NY.jpg

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007D79J.jpg

 

* * *

G.Chippalkatti/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856036) Visitor Counter : 122


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri