आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 212 कोटी 17 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील 4 कोटी 02 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पाहिली मात्रा देण्यात आली.

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 65,732

गेल्या 24 तासांत देशात 5,439 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.66%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.64%आहे

Posted On: 30 AUG 2022 9:57AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 212.17 कोटींचा (2,,12,17,41,962) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,82,59,616 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 02 लाखांहून अधिक (4,02,97,401) किशोरवयीन मुलांना  कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,14,035

2nd Dose

1,01,06,182

Precaution Dose

67,44,740

FLWs

1st Dose

1,84,34,498

2nd Dose

1,76,97,994

Precaution Dose

1,31,25,487

Age Group 12-14 years

1st Dose

4,02,97,401

2nd Dose

3,01,51,543

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,68,065

2nd Dose

5,23,02,924

Age Group 18-44 years

1st Dose

56,05,63,284

2nd Dose

51,29,90,425

Precaution Dose

6,15,11,694

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,99,602

2nd Dose

19,62,93,873

Precaution Dose

3,46,09,097

Over 60 years

1st Dose

12,75,77,402

2nd Dose

12,26,94,934

Precaution Dose

4,06,58,782

Precaution Dose

15,66,49,800

Total

2,12,17,41,962

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 65,732 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.15% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.66% झाला आहे. गेल्या 24 तासांत 22,031 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,38,25,024 झाली आहे.


गेल्या 24 तासांत, देशात नव्या 5,439 नवीन  कोविड रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण  3,20,418 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 88 कोटी 55 लाखांहून अधिक (88,55,28,970) चाचण्या करण्यात आल्या आहेत.


 देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.64% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.70% इतका नोंदला गेला आहे.

***

Jaydevi PS/VPY/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855405) Visitor Counter : 146