वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमाचे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) सह जोडल्यास एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उपक्रमाच्या कक्षा आणखी विस्तारण्यास मदत होईल - पीयूष गोयल

Posted On: 29 AUG 2022 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2022

 

एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) हा  उपक्रम ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सला  (ONDC )जोडण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.  खरेदीदार आणि विक्रेते यांना लोकतंत्रात्मक व्यासपीठावर एकत्र आणल्यास एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाच्या कक्षा आणखी विस्तारण्यास ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) मदत करेल,असे गोयल यांनी सांगितले.  आज नवी दिल्ली येथे ' एक जिल्हा एक उत्पादन भेट यादी' आणि 'एक जिल्हा एक उत्पादन स्टोअरफ्रंट' चा प्रारंभ केल्यानंतर ते बोलत होते. देशाच्या दुर्गम भागातील लोक जोपर्यंत विकासात समान भागधारक होत नाहीत तसेच प्रगतीच्या फळांचा सर्वांच्या इतकाच फायदा घेत नाहीत तोपर्यंत भारताचा विकास होऊ शकत नाही, यावर गोयल यांनी भर दिला. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम समाजातल्या उतरंडीच्या  तळाशी असलेल्या लोकांपर्यंत समृद्धी आणण्यास मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोयल यांनी  सरकारची मंत्रालये, प्रशासकीय विभाग आणि इतर सरकारी संस्थांना एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातील उत्पादनांचा केवळ देशातच नाही तर भारताबाहेर भेटवस्तू म्हणून देण्यासाठी विचार करावा असे सांगितले.

गोयल यांनी राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था (NIFT), राष्ट्रीय डिझाईन संस्था (NID) आणि भारतीय परदेश व्यापार संस्था (IIFT) सारख्या प्रख्यात संस्थांमधील विद्यार्थ्यांना एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाला चालना देण्यासाठी विविध सर्जनशील  पद्धती शोधण्याचे आवाहन केले.  एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमातील उत्पादनांचे ब्रँडींग करण्याच्या गरजेवर देखील  त्यांनी भर दिला. या उत्पादनांपैकी बहुतांश उत्पादने नैसर्गिक आणि पर्यावरणास अनुकूल , टिकाऊ आणि पृथ्वीसाठी हितकारक आहेत. या संदर्भात, गोयल यांनी भौगोलिक संकेतन (GI Tagging) प्रक्रिया सुलभ, सुव्यवस्थित आणि जलद करून भौगोलिक संकेतन (GI Tag) केलेल्या उत्पादनांच्या यादीचा विस्तार करण्याचे आवाहन केले.  बाजारपेठेतील बनावट उत्पादनांची विक्री रोखण्यासाठी अस्सल एक जिल्हा एक उत्पादनांची उपलब्धता वाढवण्याचे आवाहन त्यांनी  केले. बनावट वस्तू विकणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.  गोयल म्हणाले की, ज्या उत्पादनातील कारागिरांची संख्या कमी असल्याने ते संकटात आहेत त्या कला आणि हस्तकला प्रकारात अधिकाधिक कारागिरांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे संवर्धन होईल, असे मत गोयल यांनी व्यक्त केले.  

S.Kulkarni/S.Mukhedkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1855310) Visitor Counter : 251