रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त उद्या कार्यक्रमाचे आयोजन


डॉ. मनसुख मांडविया आणि भगवंत खुबा कार्यक्रमाला उपस्थित राहणार

प्रविष्टि तिथि: 28 AUG 2022 5:54PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त उद्या नवी दिल्लीत जनपथ स्थित डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र येथे  एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय  रसायन आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण  मंत्री डॉ. मनसुख मां‍डविया प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित राहणार आहेत . रसायन आणि खते आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य मंत्री विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमात देशभरातील औषधनिर्माण  आणि मेडटेक उपकरण उद्योग, केंद्र आणि राज्य सरकारेमूल्य देखरेख आणि संसाधन संस्था ,नागरी संस्था , रुग्ण -समर्थन गटाचे हितधारक सहभागी होतील.

यानिमित्त उद्घाटन सत्रात, सेंटर फॉर एडव्हान्स कंप्यूटिंग (सी-डैक) केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने एनपीपीए द्वारा विकसित एकात्मिक फार्मास्युटिकल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम 2.0 या एकात्मिक प्रतिसादात्मक क्लाउड-आधारित एप्लिकेशनचे उदघाटन केले जाणार आहे.  आयपीडीएमएस 2.0 चा उद्देश व्‍यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी परिचालनात  समन्वय साधणे हा आहे , जे  मूल्य नियंत्रण आदेश , 2013 अंतर्गत अनिवार्य विविध अर्जांच्या सादरीकरणासाठी एक खिडकी प्रदान करेल.  यामुळे एनपीपीएचे कामकाज कागदविरहित होईल आणि देशभरातील हितधारकांना राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण नियामकाशी जोडण्यास मदत करेल.

त्याचबरोबर अपडेटेड वैशिष्ट्यांसह फार्मा सही दाम 2.0 ऍपचे देखील उदघाटन केले जाईल. या ऍप मध्ये ग्राहक तक्रार व्यवस्थापन  प्रणाली बरोबरच स्‍पीच रेकॉगनिशन; औषधांचा ब्रँड शोधणे/फॉर्मूलेशन निहाय; शेयर सुविधा यासारखी वैशिष्ट्ये आहेत.  उद्घाटन सत्रात राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाच्या 25 वर्षांच्या घटनाक्रमावर आधारित प्रकाशन प्रसिद्ध करण्याचेही प्रस्तावित आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1855053) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil