आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला एकूण 211.13 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील 4.01 कोटीहून अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 90,707

गेल्या 24 तासांत 10,256 नव्या कोविड रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्या 98.61 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.02 टक्के

Posted On: 26 AUG 2022 9:27AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  211.13 कोटीहून (2,11,13,94,639) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,81,13,254 सत्रांतून हे साध्य केले आहे.

12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.01 कोटी (4,01,69,223) किशोरवयीनांना कोविड-19 ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची वर्धित मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,853

2nd Dose

1,01,04,793

Precaution Dose

66,99,375

FLWs

1st Dose

1,84,34,179

2nd Dose

1,76,95,262

Precaution Dose

1,30,35,160

Age Group 12-14 years

1st Dose

4,01,69,223

2nd Dose

2,99,28,856

Age Group 15-18 years

1st Dose

6,16,23,068

2nd Dose

5,21,87,960

Age Group 18-44 years

1st Dose

56,04,30,223

2nd Dose

51,25,30,807

Precaution Dose

5,61,13,465

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,73,798

2nd Dose

19,61,90,171

Precaution Dose

3,22,02,987

Over 60 years

1st Dose

12,75,61,958

2nd Dose

12,26,28,000

Precaution Dose

3,95,71,501

Precaution Dose

14,76,22,488

Total

2,11,13,94,639

 

 

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 90,707 इतकी आहे. देशातील पाॅझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.20 टक्के इतकी आहे.


परिणामी, भारतात रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.61 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात,13,528 रूग्ण कोविडमुक्त झाले असून बरे झालेल्या कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या  आरंभापासून) आता 4,37,70,913 इतकी आहे.


गेल्या 24 तासात, 10,256 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.


गेल्या 24 तासात, 4,22,322 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 88.43 कोटी (88,43,39,045) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.02 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.43 टक्के इतका नोंदवला गेला आहे


***

Sonal T./Sampada .P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854592) Visitor Counter : 160