संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टांझानियासमवेत संरक्षण सहकार्य वाढवण्याबाबत राजनाथ सिंह आणि टांझानियाच्या संरक्षण मंत्री यांच्यात 26 ऑगस्ट 22 रोजी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा

Posted On: 25 AUG 2022 8:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 26 ऑगस्ट 2022 रोजी टांझानियाच्या संरक्षण आणि राष्ट्रीय सेवा मंत्री डॉ. स्टरगोमेना लॉरेन्स टॅक्स यांच्याशी नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही देशातील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी द्विपक्षीय चर्चेदरम्यान, दोन्ही मंत्री उभय देशांमधील संरक्षण सहकार्याचा आढावा घेतील आणि संरक्षण उद्योग सहकार्यासह नवीन मार्गांचा धांडोळा घेतील. 2003 मध्ये उभय देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेला सामंजस्य करार म्हणजे संरक्षण सहकार्यासाठी प्रगतीपथावरील उपक्रमांसाठी अधिक लवचिक आराखडा होय.

भारतातील मुक्कामादरम्यान डॉ. टॅक्स हैदराबादलाही भेट देणार आहेत, जिथे त्या भारतीय संरक्षण उद्योगांशी संवाद साधणार आहेत.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1854495) Visitor Counter : 154


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi