ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तपासणी सुविधांचा अधिक चांगला वापर करण्यासाठी भारतातील सर्व विद्यमान प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करुन त्या चिन्हीत केल्या पाहिजेत- केंद्रीय मंत्री पीयूष गोयल


'ब्रँड इंडिया'च्या विकासात भारतीय मानक ब्युरोची महत्त्वपूर्ण भूमिका: पीयूष गोयल

Posted On: 25 AUG 2022 5:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट 2022

 

तपासणी सुविधांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करता यावा यासाठी भारतातील सर्व विद्यमान प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण आणि ते चिन्हांकित केले जावेत असे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय मानक ब्युरोच्या (बीआयएस) प्रशासकीय परिषदेच्या चौथ्या बैठकीला ते काल नवी दिल्लीत संस्थेच्या कार्यालयात अध्यक्षीय मार्गदर्शन करत होते. प्रयोगशाळांच्या पायाभूत सुविधा एकीकृत आणि  अद्ययावत करण्याच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला.  उत्कृष्ट प्रयोगशाळा चांगल्या मानकांच्या निर्मितीला चालना देतील तसेच प्रमाणीकरणात सुलभता आणतील. तरुण तंत्र व्यावसायिक आणि तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळांच्या भेटी आयोजित करत ,चाचणी प्रक्रियेची माहिती मिळावी असे ते म्हणाले.

ग्राहक व्यवहार राज्यमंत्री, बीआयएसच्या प्रशासकीय परिषदेचे  पदसिद्ध उपाध्यक्ष अश्विनी कुमार चौबे आणि प्रशासकीय परिषदेचे मान्यवर सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

बीआयएसला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गोयल यांनी अभिनंदन केले. बीआयएस, देशासोबत विकसित झाली आहे आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सातत्याने योगदान देत आहे असे ते म्हणाले. ‘ब्रँड इंडिया’च्या विकासात बीआयएसची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  युवा आणि माता यांची  शक्ती गुणवत्तेच्या जाणीवजागृतीसाठी वापरली पाहिजे.  तरुणाईला दर्जा आणि गुणवत्तेबद्दल जागरूक करण्यासाठी बीआयएसद्वारे शाळेत स्टँडर्ड क्लब तयार करण्याच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले.

उत्पादनाच्या उदयोन्मुख क्षेत्रात भारताने अग्रेसर राहावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्याला पाठबळ देण्यासाठी मानके विकसित करण्याच्या दिशेने बीआयएसने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

बीआयएसने मानके तयार केल्याबद्दल अश्विनी कुमार चौबे यांनी त्यांच्या भाषणात प्रशंसा केली. या मानंकामुळे उत्पादकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकार्ह उत्पादनांचे उत्पादन करण्यास सक्षम केले जाते. ते केवळ ग्राहकांच्या फायद्यासाठी एक मोठे पाऊल नाही तर निर्यात देखील सुलभ करते. बीआयएस मुख्यालयाच्या मानकालय या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे यावेळी गोयल यांनी उद्घाटन केले.  त्यांनी बीआयएसच्या सुधारित संकेतस्थळाचे देखील प्रकाशन केले. यामाध्यमातून वापरकर्ता अनुकूल इंटरफेसद्वारे सहज माहिती मिळवू शकते. सोबतच बीआयएसच्या सर्व महत्त्वाच्या उपक्रमांसह हे संकेतस्थळ अद्ययावत केले आहे.

 

N.Chitale/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1854419) Visitor Counter : 170