शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुधारणा, नवकल्पना आणि उद्योजकता यांच्या मिलाफामुळे भारतात अभूतपूर्व संधी - धर्मेंद्र प्रधान

Posted On: 23 AUG 2022 6:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2022

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री प्रधान यांनी आज कांगन इन्स्टिट्यूट, डॉकलँड्स, मेलबर्न येथे" व्यावसायिक शिक्षण : कौशल्य विकासावर  धोरणात्मक संवाद" मध्ये  भाग घेतला.   व्हिक्टोरिया  कौशल्य प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रेग रॉबर्टसन तसेच बेंडीगो कांगन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  आणि ऑस्ट्रेलियन स्किलिंग इकोसिस्टमच्या नेत्या सॅली कर्टन यांनीही या चर्चेत भाग घेतला.  तरुणांना भविष्यातील कौशल्यांनी सुसज्ज बनवणे , त्यांना रोजगार मिळवून देणे , कौशल्य सुधारणे तसेच  उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राचे संबंध मजबूत करणे आणि कौशल्यविषयक गरजांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी  भारतामध्ये ऑस्ट्रेलियन कौशल्य मानके आणि प्रमाणीकरण संबंधी रूपरेषा तयार करण्याबाबत चर्चा झाली.

प्रधान यांनी ऑस्ट्रेलियातील कौशल्य विकास संस्थांसोबत सहकार्यासाठी भारत उत्सुक असल्याचे सांगितले.  कौशल्य विकासामध्ये परस्पर प्राधान्यक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि ऑस्ट्रेलियात उपलब्ध असणाऱ्या अनेक संधींसाठी भारताच्या तरुणांना कुशल बनवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.प्रधान यांनी बेंडीगो कांगन संस्थेतील ऑटोमोटिव्ह सेंटर ऑफ एक्सलन्सलाही भेट दिली.

प्रधान यांनी मेलबर्न येथील डीकिन विद्यापीठालाही भेट दिली आणि या विद्यापीठातले  उद्योग क्षेत्राला अनुकूल अभ्यासक्रम, संशोधन क्षेत्रांतील विविध पदव्या आणि प्रवेशासाठीच्या नियमांचा तपशीलवार आढावा घेतला. प्रधान म्हणाले की भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी, अनेक क्षेत्रांतील सुधारणा आणि संशोधन तसेच स्टार्ट-अपला अनुकूल वातावरणामुळे भारतात अमाप संधी आहेत.  प्रधान यांनी डीकिन विद्यापीठ आणि सर्व ऑस्ट्रेलियन विद्यापीठे आणि कौशल्य विकास संस्थांना भारतातील संधीचा लाभ घेण्याचे, आपल्या देशांना ज्ञानआधारित अर्थव्यवस्थेत रूपांतरित करण्यासाठी आणि  दोन्ही देशातील लोकांच्या समृद्धीसाठी एकमेकांकडून सर्वोत्तम पद्धती शिकण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे  आवाहन केले.

या दौऱ्यादरम्यान प्रधान यांनी मेलबर्नमधील अनिवासी भारतीयांशीही  संवाद साधला.

 

S.Kane/G.Deoda/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1853916) Visitor Counter : 193