आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आयुष्मान भारत डिजिटल अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्य संस्थांना हार्डवेअर विषयक मार्गदर्शक सूचना केल्या जारी

Posted On: 22 AUG 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑगस्‍ट 2022

 

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने, देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या, रुग्णालये, चिकित्सा केंद्रे आणि आरोग्य व निरामयता केंद्रे अशा आरोग्य संस्थामध्ये डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हार्डवेअर विषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ह्या मार्गदर्शक सूचना, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना, आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM)शी संबंधित, सर्व अॅप्लिकेशन्सचा वापर कसा करावा, याचे नियोजन, मूल्यांकन आणि प्रक्रिया शिकवणाऱ्या माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरविषयी एक मूलभूत आराखडा उपलब्ध करुन देणाऱ्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती देतांना, डॉ. आर एस. शर्मा, हे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकारणाचे मुख्य अधिकारी, म्हणाले, “ह्या योजनेच्या अंमलबजावणीसाठीचे पहिले पाऊल म्हणजे, सर्व रुग्णालयांचे डिजिटलीकरण करणे हे आहे. अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, अशा मार्गदर्शक सूचनांची गरज व्यक्त केली होती. अशा सूचना, ज्यातून सर्वांना, आरोग्य सुविधांच्या आकारामानाचा अभ्यास करुन, त्यानुसार, माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधांची गरज जोखता येईल.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे, अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना, ह्या सुविधा उपलब्ध करण्यात मदत मिळून,त्यानुसार, आयुष्मान भारत डिजिटल अभियानाची अंमलबजावणी कारणे सोपे जाईल.” 

आयुष्मान भारत डिजिटल मिशन, उपचारांची प्रक्रिया सुलभ करेल आणि देशभरातील रुग्णालये आणि इतर आरोग्य सुविधांच्या आरोग्यविषयक डिजिटल सुविधाच नाही तर एकमेकांशी संलग्न राहण्याची सुविधाही यामुळे  वाढवली जाईल.

ह्या डिजिटल व्यवस्थेमुळे टेलीकन्सल्टेशन , कागदविरहित आरोग्य नोंदी ठेवणे, क्यूआर कोड आधारित ओपीडी नोंदणी इत्यादी इतर सुविधा देखील अधिक मजबूत होतील. आरोग्य नोंदींचे डिजिटायझेशन झाल्यामुळे रुग्णांच्या जुन्या वैद्यकीय नोंदी गहाळ  होणार नाहीत आणि त्या कधीही कुठेही उपलब्ध असतील.

आवश्यक त्या माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा सुनिश्चित करणे आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील सर्व आरोग्य सुविधांमध्ये हॉस्पिटल माहिती व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी करणे संपूर्ण पर्यावरणातील डिजिटल आरोग्य नोंदी तयार करण्यात आणि देवाणघेवाण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

डिजिटल व्यवस्थेला पाठबळ देण्यासाठीच्या माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर वैशिष्ट्यांवरील मार्गदर्शक सूचना इथे उपलब्ध आहेत.

https://abdm.gov.in:8081/uploads/Hardware_Guidelines_ABDM_e162cf7a7b.pdf

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सर्व स्तरावरील आरोग्य सेवा संस्थांसाठी आयटी मालमत्तेचे नियोजन आणि खरेदी करताना, हार्डवेअर आवश्यकतांचे मूल्यांकन करण्यासाठी हे दस्तावेज उपयुक्त ठरतील. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना, सुधारणा सुचवणाऱ्या तसेच शिफारस स्वरूपात आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि आरोग्य सुविधा केंद्रांना  स्थानिक गरजा आणि परिस्थितींच्या आधारे ह्या  मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

* * *

N.Chitale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853630) Visitor Counter : 170