संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री मंत्री राजनाथ सिंह उद्या नवी दिल्लीत करणार ‘आत्मपरिक्षण: सशस्त्र सेना न्यायाधिकरण’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2022 9:20AM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 20 ऑगस्ट 2022 रोजी नवी दिल्ली येथे 'आत्मपरिक्षण: सशस्त्र सेना न्यायाधिकरण' या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करणार आहेत. सशस्त्र सेना न्यायाधिकरण (प्रधान पीठ) बार असोसिएशनने याचे आयोजन केले आहे. सशस्त्र दलातील सेवारत कर्मचार्यांव्यतिरिक्त माजी सैनिक, त्यांचे कुटुंब आणि शहीदांच्या पत्नी यांना ही न्यायप्रक्रीया आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि जलद असावी हे सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र सेना न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले. कामकाजाचे विश्लेषण करणे, कोणत्याही त्रुटींवर उपाय सुचवणे आणि याचिकाकर्त्यांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवणे हा चर्चासत्राचा उद्देश आहे.
संरक्षणमंत्री प्रमुख पाहुणे असतील, तर कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू सन्माननीय अतिथी असतील. या चर्चासत्रात संरक्षण मंत्रालय, कायदा आणि न्याय मंत्रालय आणि न्यायपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. चर्चासत्राचे आयोजन सशस्त्र सेना न्यायाधिकरणाच्या स्थापना दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित केले जात आहे.
******
SK/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1853079)
आगंतुक पटल : 180