आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील एकत्रित कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 208.95 कोटीचा टप्पा पार केला


12-14 वयोगटातील मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 3 कोटी 98 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

सध्या भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या 1,01,343

गेल्या 24 तासांत, 12,608 नव्या कोविड रूग्णांची नोंद

देशातील कोविडमुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.58 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 4.20 टक्के

Posted On: 18 AUG 2022 9:47AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसमात्रांच्या संख्येने 208.95  (2,08,95,79,722) कोटीचा टप्पा पार केला आहे. 2,77,65,601 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे.

12 ते 14  वयोगटातील मुलामुलींसाठी  कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत, 3.98 कोटी (3,98,46,763) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक पहिली लसमात्रा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 वर्धक लसीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून देण्यास सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,328

2nd Dose

1,01,00,084

Precaution Dose

65,93,725

FLWs

1st Dose

1,84,33,275

2nd Dose

1,76,87,456

Precaution Dose

1,28,16,972

Age Group 12-14 years

1st Dose

3,98,46,763

2nd Dose

2,93,46,650

Age Group 15-18 years

1st Dose

6,15,08,462

2nd Dose

5,18,54,238

Age Group 18-44 years

1st Dose

56,01,35,522

2nd Dose

51,13,51,618

Precaution Dose

4,53,09,532

Age Group 45-59 years

1st Dose

20,38,14,172

2nd Dose

19,58,95,343

Precaution Dose

2,71,57,678

Over 60 years

1st Dose

12,75,25,220

2nd Dose

12,24,35,520

Precaution Dose

3,73,54,164

Precaution Dose

12,92,32,071

Total

2,08,95,79,722

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,01,343  इतकी आहे.  देशातील एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 0.23 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारताचा कोविडमुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.58 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 16,251  रूग्ण कोविडमधून मुक्त झाले असून कोविडमुक्त झालेल्यांची एकत्रित संख्या (महासाथ सुरू झाल्यापासून) 4,36,70,315  इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 12,608 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 3,62,020  कोविड-19 चाचण्या पार पडल्या आहेत. तर  भारतात आतापर्यंत एकूण 88.14 कोटी (88,14,18,561) चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्याच्या घडीला 4.20 टक्के इतका आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.48 टक्के इतका आहे.

 ***

SushmaK/UmeshK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852800) Visitor Counter : 195