वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2022-23 मध्ये 23.56 अब्ज अमेरिकन डॉलरचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कृषी निर्यातीला नव्याने चालना

Posted On: 14 AUG 2022 4:28PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या कृषी उत्पादन निर्यात प्रोत्साहन संस्था म्हणजेच अपेडाने वर्ष 2022-23 वित्तीय वर्षासाठी  23.56 अब्ज अमेरिकन डॉलर निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भागधारकांपर्यंत पोहचण्याचे धोरण आखले आहे. चालू वर्षात निर्यातीला चालना देण्यासाठी 300 कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली आहे.

प्रस्तावित महत्वाकांक्षी धोरणांतर्गत, निर्यातदार, शेतकरी, कृषी व्यावसायिक, खाद्यपदार्थ प्रक्रियादार, पुरवठा साखळी वाहतूकदार, परकीय चलन व्यवस्थापन कंपन्या आदींपर्यंत विविध मुख्य प्रवाहातील प्रकाशने आणि इलेक्ट्रॉनिक वाहिन्या तसेच प्रमुख समाजमाध्यम मंच यांच्याशी ज्या कृषी उत्पादनांची विपुल निर्यात क्षमता आहे, त्यांच्यावर ठळक प्रकाश टाकण्यासाठी नियमित आणि मजबूत संपर्क स्थापित केला जाईल.

अधिकाधिक निर्यातदारांना आकर्षिक करून घेण्यासाठी, अपेडाची निर्यात प्रक्रियेसंबंधी माहितीपत्रके विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांसह विविध मंचांवर प्रसारित केली जातील. तसेच तळागाळातील तसेच ग्रामीण स्तरावर निर्यातीच्या लाभांसह तिची प्रक्रियेबाबत एक पानी बातम्या वितरित केल्या जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या केलेल्या आवाहनाच्या धर्तीवर, प्रत्यक्ष आणि तांत्रिक प्रशिक्षणासह होतकरू कृषी व्यावसायिकांचे संगोपन करून त्यांनी कृषी निर्यात हे क्षेत्र आकर्षक करिअर म्हणून निवडावे, यासाठी त्यांना प्रेरित केले जाईल.

निर्यातदारांच्या यशाच्या गाथांसंबंधी व्हिडिओ आणि इन्फो ग्राफिक्स बनवून  समाज माध्यमांमध्ये त्याचे नियमित प्रोत्साहन देण्याचेही प्रस्तावित केले आहे. कृषी निर्यात प्रोत्साहन संस्थेने शेतकरी, स्टार्ट अप्स, निर्यातदार, आदींच्या प्रेरणादायक यशोगाथा विविध मुद्रित आणि समाज माध्यमांमध्ये छापून आणण्याचेही प्रस्तावित केले आहे.

***

S.Tupe/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851801) Visitor Counter : 160