आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील एकत्रित कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने केला 207.99 कोटीचा टप्पा पार


12-14 वयोगटातील 3 कोटी 91 लाखांहून अधिक किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,16, 861

गेल्या 24 तासांत, 14,092 नव्या कोविड रूग्णांची नोंद

देशातील कोविडमुक्तीचा दर सध्याच्या घडीला 98.54 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 4.57 टक्के

Posted On: 14 AUG 2022 12:15PM by PIB Mumbai

 

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसमात्रांच्या संख्येने 207.99  (2,07,99,63,555) कोटीचा टप्पा पार केला आहे. 2,76,28,993 सत्रांमधून हे साध्य करण्यात आले आहे.

12 ते 14  वयोगटातील किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आली. आतापर्यंत, 3.97 कोटी (3,97,58,762) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 ची पहिली लसमात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 खबरदारीच्या लसीची मात्रा 10 एप्रिल 2022 पासून देण्यास सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,13,026

2nd Dose

1,00,98,563

Precaution Dose

65,46,956

FLWs

1st Dose

1,84,32,828

2nd Dose

1,76,84,642

Precaution Dose

1,27,26,289

Age Group 12-14 years

1st Dose

3,97,58,762

2nd Dose

2,91,38,372

Age Group 15-18 years

1st Dose

6,14,66,849

2nd Dose

5,17,56,181

Age Group 18-44 years

1st Dose

56,00,36,441

2nd Dose

51,09,48,264

Precaution Dose

4,03,56,447

Age Group 45-59 years

1st Dose

20,37,94,844

2nd Dose

19,58,01,961

Precaution Dose

2,47,74,704

Over 60 years

1st Dose

12,75,13,084

2nd Dose

12,23,78,654

Precaution Dose

3,63,36,688

Precaution Dose

12,07,41,084

Total

2,07,99,63,555

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 1,16,861 इतकी आहे. देशातील एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण 0.26 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.54 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात, 16,454 रूग्ण कोविडमधून मुक्त झाले असून कोविडमुक्त झालेल्यांची एकत्रित संख्या (महामारी सुरू झाल्यापासून) 4,36,09,566 इतकी झाली आहे.

गेल्या 24 तासात, 14,092 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात, 3,81,861 कोविड-19 चाचण्या पार पडल्या आहेत. तर भारतात आतापर्यंत एकूण 88.02 कोटी (88,02,82,103) चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्याच्या घडीला 4.57 टक्के इतका आहे तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.69 टक्के इतका आहे.

***

S.Tupe/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1851707) Visitor Counter : 115