पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात 75 रामसर स्थळे

Posted On: 13 AUG 2022 1:08PM by PIB Mumbai

भारताने रामसर स्थळांच्या यादीत आणखी 11 पाणथळ क्षेत्रांचा समावेश केल्यामुळे स्वांतत्र्याच्या 75 व्या वर्षात रामसर स्थळांची संख्या 75 झाली आहे ज्यांचा देशात 13,26,677 हेक्टर क्षेत्रावर विस्तार आहे.

S.No

Name of wetland

Area in Ha

State

1.       

Tampara Lake

300

Odisha

2.       

Hirakud Reservoir

65400

3.       

Ansupa Lake

231

4.       

Yashwant Sagar

822.90

Madhya Pradesh

5.       

Chitrangudi Bird Sanctuary

260.47

Tamil Nadu

6.       

Suchindram Theroor Wetland Complex

94.23

7.       

Vaduvur Bird Sanctuary

112.64

8.       

Kanjirankulam Bird Sanctuary

96.89

9.       

Thane Creek

6521.08

Maharashtra

10.   

Hygam Wetland Conservation Reserve

801.82

Jammu and Kashmir

11.   

Shallbugh Wetland Conservation Reserve

1675

 

Total area of 11 sites

76316

 

 

  Year wise designation of 75 Ramsar sites

 

S. No.

Year of Designation

No of site designated

(As per date of designation)

Sites designated upto 2013

and

after 2014 to till date

Area covered in Ha

1

1981

2

26

(1981 to 2013)

 

633871

2

1990

4

3

2002

13

4

2005

6

5

2012

1

6

2019

11

49

(2014 to 2022)

 

692807

 

7

2020

5

8

2021

14

9

2022

19

 

Total

75

75

1326678

  

या नव्या 11 स्थळांमध्ये तामिळनाडूमधील चार(4), ओदिशामधील तीन(3), जम्मू आणि काश्मीरमधील दोन(2) आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका स्थळाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ठाण्याची खाडी रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

या जागांना रामसर स्थळांचा दर्जा मिळाल्यामुळे पाणथळ जागांचे संवर्धन आणि व्यवस्थापन आणि त्यांच्या परिसरातील साधनसंपत्तीचा व्यवहार्य वापर करण्यास मदत होईल.

2022 या वर्षात एकूण 28 जागा रामसर स्थळे म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. रामसर प्रमाणपत्रामध्ये नामांकनांच्या तारखेनुसार या जागांची या वर्षातील(2022) संख्या 19 आणि गेल्या वर्षातील(2021) संख्या 14 आहे.

 

ठाण्याची खाडी

ठाण्याची खाडी भारतात महाराष्ट्रात आहे. या खाडीला गोड्या पाण्याच्या अनेक नद्या येऊन मिळतात. त्यापैकी उल्हास नदी हा सर्वात मोठा गोड्या पाण्याचा स्रोत आहे. त्याबरोबरच मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामधील अनेक उपनगरांमधील सांडपाण्याच्या वाहिन्यांमधील सांडपाणी देखील या खाडीमध्ये सोडण्यात येते. ठाणे खाडी ही फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आली आहे. या खाडीच्या दोन्ही तीरावर खारफुटी वनस्पतीची झुडपे पसरलेली आहेत आणि त्यामध्ये भारतीय खारफुटींच्या प्रजातींपैकी 20 टक्क्यांचा समावेश आहे. खारफुटींची जंगले नैसर्गिक निवारा पट्टा म्हणून काम करतात आणि चक्रीवादळे, लाटांचे तडाखे, खाऱ्या पाण्याची गळती आणि शिरकाव यांपासून जमिनींचे संरक्षण होते. अनेक माशांसाठी ही खारफुटीची जंगले म्हणजे वाटिका असतात आणि त्यामुळे स्थानिक मासेमारी टिकून राहते. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचा मध्य आशियायी हवाई मार्ग म्हणून हा पाणथळ परिसर अतिशय महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचे पक्षी क्षेत्र(IBA) म्हणून त्याची गणना होते. विविध प्रदेशातील पक्ष्यांच्या 202 प्रजातींव्यतिरिक्त या खाडीत मासे, खेकडे, कालवं, शिंपले यांच्यासारखे कवचधारी जलचर यांच्या 18 प्रजाती, फुलपाखरांच्या 59 प्रजाती, कीटकांच्या 67 प्रजाती आणि माशांचे खाद्य असलेले सागरी जीव फायटोप्लँक्टनच्या 35 आणि झूप्लँक्टनच्या 24 आणि बेंथोसच्या 23 प्रजाती आढळतात.

https://rsis.ramsar.org/RISapp/files/4831683/pictures/Lesser%20Flamingo%2004-02-2021%20(6).JPG        https://rsis.ramsar.org/RISapp/files/4831683/pictures/Lesser%20Flamingo-%20December%202021.JPG

             congregation of Lesser flamingos                                        Closeup view

https://rsis.ramsar.org/RISapp/files/4831683/pictures/Mangroves%2019-06-2021%20(3).JPG     https://rsis.ramsar.org/RISapp/files/4831683/pictures/WhatsApp%20Image%202022-04-05%20at%202.09.52%20PM.jpeg 

              Mangroves of Thane creek                                            Flamingoes in Thane creek

***

S.Kane/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851526) Visitor Counter : 3909