मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
भारत सरकार साजरा करत आहे "हर घर तिरंगा" कार्यक्रम
गुजरातमधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकावर पुरुषोत्तम रुपाला यांनी फडकावला राष्ट्रध्वज
देशभरात 400 प्रसिद्ध स्थळांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून कार्यक्रमांचे आयोजन
Posted On:
12 AUG 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022
11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत भारत सरकार "हरघर तिरंगा" हा कार्यक्रम साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या अंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार देशभरातील 400 प्रसिद्ध स्थळांवर हा कार्यक्रम साजरा करत आहे.
राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ (NDDB), गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघ (GCMMF) आणि वलसाड जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित यांच्या सहकार्याने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, भारत सरकार तर्फे 12 ऑगस्ट 2022 रोजी हर घर तिरंगा कार्यक्रम राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक, दांडी, नवसारी, गुजरात येथे साजरा केला केला.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते.
राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारक, दांडी, गुजरात येथे पुरुषोत्तम रुपाला यांनी राष्ट्रध्वज फडकावला. यावेळी शहिदांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी लोकांना "हर घर तिरंगा" मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजरात सरकारने मोठ्या उत्साहाने प्रशासकीय आणि लॉजिस्टिक्स पाठबळ उपलब्ध करून दिले.
S.Patil/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851351)
Visitor Counter : 344