संरक्षण मंत्रालय
मलेशियाने आयोजित केलेल्या संयुक्त सराव कवायतींत भारतीय हवाई दल सहभागी होणार
Posted On:
12 AUG 2022 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2022
भारतीय हवाई दलाची एक तुकडी 'उदारशक्ती' या द्विपक्षीय सरावात सहभागी होण्यासाठी आज मलेशियाला रवाना झाली.
भारतीय हवाई दल या हवाई सरावात सुखोई-30 एमकेआय आणि C-17 विमानांसह सहभागी होत आहे तर मलेशियाचे रॉयल मलेशियन एअर फोर्स (RMAF) सुखोई- 30 एमकेएम विमाने उडवणार आहे. भारतीय तुकडी एका हवाई तळावरून थेट रॉयल मलेशियन एअर फोर्सच्या कुआंतन तळाकडे रवाना झाली.
या सरावामुळे भारतीय हवाई दलातील सदस्यांना रॉयल मलेशियन एअर फोर्समधील काही सर्वोत्तम कौशल्यप्राप्त सदस्यांसोबत दोन्ही दलांमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची आणि शिकण्याची संधी मिळेल, तसेच परस्पर लढाऊ क्षमतांवर एकमेकांशी चर्चा करता येईल.
या चार दिवसांच्या सरावात दोन्ही हवाई दलांमार्फत विविध लढाऊ हवाई कवायतींचे आयोजन केले जाईल. उदारशक्ती हा सराव मैत्रीचे दीर्घकालीन बंध मजबूत करेल आणि दोन्ही हवाई दलांमध्ये संरक्षण सहकार्यासाठीची नवी दालने खुली करेल, ज्यामुळे या प्रदेशातील सुरक्षेला बळकटी मिळेल.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851235)
Visitor Counter : 248