माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कांगडा केंद्रीय सहकारी बँकेच्या अभूतपूर्व विकासाबद्दल केले अभिनंदन
कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे 3000 कोटी रुपयांची वाढ : अनुराग ठाकूर
"सहकारातून समृद्धी", या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचे ठाकूर यांनी केले स्मरण
Posted On:
11 AUG 2022 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2022
कांगडा केन्द्रीय सहकारी बँकेने (केसीसीबी) अभूतपूर्व झेप घेतल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज अभिनंदन केले. अवघ्या चार वर्षांपूर्वी सुमारे 46 कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या बँकेला 2021-22 या आर्थिक वर्षात 87 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बँकेला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वाधिक नफा असल्याबद्दल ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला.
सरकार, सहकाराची शक्ती आणि ‘स्वातंत्र्याचा अमृतकाळ ’ यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचा ठाकूर यांनी पुनरुच्चार केला. सहकारी संस्था बाजारपेठेत स्पर्धात्मक व्हाव्यात आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सहकारी संस्थांवरील करात कपात करणे ही त्या ध्येयाकडे वाटचाल आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले आहे. बँकेच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे "सहकारिता से समृद्धी" (सहकारातून समृद्धी) हे ब्रीदवाक्य पुढे येईल असे ते म्हणाले.
गेल्या चार वर्षांत बँकेच्या वाढीचा उल्लेख करत बँकेने विविध सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत ग्राहकांच्या नोंदणीत लक्षणीय वाढ केली आहे असे ठाकूर यांनी सांगितले. बँकेच्या सर्व 1,400 कर्मचार्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या 17 लाखांहून अधिक ग्राहकांना समर्पित सेवा दिल्यामुळे गेल्या चार वर्षांत बँकेची 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
कांगडा केन्द्रीय सहकारी बँकेबद्दल (केसीसीबी)
केसीसीबीला 1920 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले आणि त्याच वर्षी मार्चमध्ये त्यांनी काम सुरू केले. धर्मशाला येथील मुख्य कार्यालयासह बँकेच्या सध्या 26 शाखा आहेत. गेल्या चार वर्षांत बँकेने विविध निर्देशांकांमध्ये प्रचंड वाढ केली आहे. बँकेच्या गुंतवणुकीत 2324 कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर राखीव निधी 26 कोटींनी वाढला आहे. 31 मार्च 2018 रोजी असलेल्या 4.55 कोटी रुपयांच्या तुलनेत 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा वाढून 87.53 कोटी रुपये झाला आहे.
S.Kulkarni/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1850964)
Visitor Counter : 150