युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागाच्या नवव्या फेरीच्या सामन्यात शशिकिरण, एरिगायसी यांच्या कामगिरीमुळे ब्राझीलवर भारत अ संघाचा विजय

Posted On: 08 AUG 2022 6:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

कृष्णन शशिकिरण आणि अर्जुन एरिगायसी यांच्या विजयामुळे,  रविवारी तामिळनाडूच्या ममल्लापुरम येथे 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागाच्या नवव्या फेरीच्या सामन्यात भारत अ संघाला आपली लय सापडली आणि भारताने ब्राझीलचा 3-1 असा पराभव केला.

शनिवारी आर्मेनियाकडून झालेल्या पराभवानंतर या सामन्यात  भारत अ संघाने विजयी सुरुवात केली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0010A8T.jpg  https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002SM1M.jpg

भारत क संघानेही पॅराग्वेचा  3-1 असा पराभव करत विजय संपादन केला.

खुल्या गटातील आणखी एका सामन्यात, अमेरिकेने  ग्रीसविरुद्ध 2.5-1.5 असा विजय नोंदवून शनिवारी भारताविरुद्ध पत्करावा लागलेला  पराभव मागे टाकला. सध्या, उझबेकिस्तान 16 गुणांसह खुल्या विभागात आघाडीवर आहे, त्याखालोखाल  भारत ब आणि आर्मेनिया यांचे  प्रत्येकी 15 गुणआहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003EK3T.jpg    https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004TBA6.jpg

महिला विभागात, भारत ब आणि भारत क संघाने स्वित्झर्लंड आणि एस्टोनियाचा अनुक्रमे 4-0 आणि  3-1  ने पराभव केला तर भारत अ संघाला चौथ्या मानांकित पोलंडकडून 1.5-2.5 असा  पराभव पत्करावा लागला.

एका महत्त्वपूर्ण सामन्यात , द्वितीय मानांकित युक्रेनला जॉर्जियाने 2-2 असे बरोबरीत रोखले आणि त्यामुळे  महिला गटात भारत अ अव्वल स्थानावर राहिला मात्र आता जॉर्जिया, पोलंड आणि कझाकस्तान यांचेही  प्रत्येकी 15 गुण झाले आहेत.


* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849989) Visitor Counter : 134