आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 206 कोटी 56 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 3 कोटी 95 लाखांहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,35,510

गेल्या 24 तासात देशात 16,167 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.50%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.64% आहे

Posted On: 08 AUG 2022 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 206 कोटी 56 लाखांचा (2,06,56,54,741) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,73,95,158 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 95 लाखांहून अधिक (3,95,17,944) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 पासून  सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय वर्गवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412659

2nd Dose

10095569

Precaution Dose

6466927

FLWs

1st Dose

18432023

2nd Dose

17679680

Precaution Dose

12559454

Age Group 12-14 years

1st Dose

39517944

2nd Dose

28729649

Age Group 15-18 years

1st Dose

61364340

2nd Dose

51505188

Age Group 18-44 years

1st Dose

559848193

2nd Dose

510157649

Precaution Dose

33599308

Age Group 45-59 years

1st Dose

203753295

2nd Dose

195616592

Precaution Dose

21263233

Over 60 years

1st Dose

127484610

2nd Dose

122253712

Precaution Dose

34914716

Precaution Dose

10,88,03,638

Total

2,06,56,54,741

 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,35,510 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.31% आहे.

त्यामुळे, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.50% झाला आहे. गेल्या 24 तासात 15,549 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,34,99,659 झाली आहे.

गेल्या 24 तासात, देशात नव्या 16,167 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,63,419 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 81 लाखांहून अधिक (87,81,88,162) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.64% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 6.14%.इतका नोंदला गेला आहे.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1849776) Visitor Counter : 116