युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या नवव्या दिवशी भारताने जिंकली एकूण 14 पदके


यात 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदकांचा समावेश

कुस्तीमध्ये विनेश फोगट, रवी दहिया आणि नवीन तर पॅरा टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल यांनी पटकावले सुवर्णपदक

Posted On: 07 AUG 2022 6:00PM by PIB Mumbai

 

ठळक मुद्दे:

  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
  • हा एक ऐतिहासिक दिवस आहे असे सांगत अनुराग ठाकूर यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या 9 व्या दिवशी भारताने चार सुवर्ण, तीन रौप्य आणि सात कांस्य पदकांसह 14 पदके जिंकली. विनेश फोगट, रवी दहिया आणि नवीन यांनी कुस्तीमध्ये तर भाविना पटेल यांनी पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदके जिंकली. प्रियांका गोस्वामी आणि अविनाश साबळे यांनी ऍथलेटिक्स तर पुरुषांच्या लॉन बाॅल्स संघाने ( 4 पुरुषांचा संघ ) रौप्य पदक जिंकले. कुस्तीमध्ये पूजा गेहलोत, पूजा सिहाग आणि दीपक नेहरा, मुष्टियुद्धात जैस्मिन लांबोरिया, रोहित टोकस आणि मोहम्मद हुसामुद्दीन आणि पॅरा टेबल टेनिसमध्ये सोनलबेन मनुभाई पटेल यांनी कांस्यपदक जिंकले. 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि 16 कांस्य पदकांसह भारताच्या पदकांची संख्या 40 वर पोहोचली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी या कामगिरीबद्दल पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रपतींनी प्रियांकाचे अभिनंदन केले आणि ट्विट केले, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रेस वॉकिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल प्रियंका गोस्वामीचे अभिनंदन. रेस वॉकिंगमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून तुम्ही यशाचा नवा अध्याय सुरू केला आहे. तुमचा पराक्रम लाखो लोकांना, विशेषतः आमच्या मुलींना प्रेरणा देईल. दुसर्‍या ट्विटमध्ये राष्ट्रपती म्हणाल्या, # राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये #स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल अविनाश साबळे यांचे अभिनंदन. तुम्ही तुमच्या कामगिरीचा स्तर सातत्याने वाढवत आहात, जो तुमच्या यशाचा एक प्रेरणादायी पैलू आहे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा.

भाविनाचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्विट केले की, टोकियो पॅरालिम्पिक 2020 ची रौप्यपदक विजेती, भाविना पटेलने भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी पुन्हा एकदा केली आहे. #राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल भाविनाचे अभिनंदन. दुसर्‍या ट्विटमध्ये राष्ट्रपती म्हणाल्या, "#राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मुष्टीयुद्धात कांस्यपदक जिंकल्याबद्दल रोहित टोकसचे अभिनंदन."

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिसमध्ये कांस्य जिंकल्याबद्दल सोनलबेन पटेल, कुस्तीमध्ये कांस्य जिंकल्याबद्दल दीपक नेहरा, मुष्टियुद्धामध्ये कांस्य जिंकल्याबद्दल मोहम्मद हुसामुद्दीन, कुस्तीमध्ये कांस्य जिंकल्याबद्दल पूजा सिहाग यांचेही राष्ट्रपतींनी अभिनंदन केले.

नवीनचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्विट केले की, कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अतिशय तरुण आणि अत्यंत प्रतिभावान नवीनचे हार्दिक अभिनंदन.

विनेशचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्विट केले की, विनेश फोगटचे मनापासून अभिनंदन आणि सर्वोच्च कौतुक. कुस्तीत सलग तिसरे सुवर्ण जिंकून तिने इतिहास रचला आहे.

रवीचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्विट केले, #राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून रवी कुमार दहियाने केलेल्या अपवादात्मक कामगिरीबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन.

पूजा गेहलोतच्या अध्यक्षांनी ट्विट केले, #राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पूजा गेहलोतचे मनःपूर्वक अभिनंदन. आणखी एका ट्विटमध्ये राष्ट्रपतींनी म्हटले आहे, युवा मुष्टियोद्धा जैस्मिन लांबोरियाचे पदार्पणातच कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.

लॉन बॉल्स संघाचे अभिनंदन करताना राष्ट्रपतींनी ट्विट केले, #राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये लॉन बॉल्समध्ये रौप्यपदक जिंकल्याबद्दल टीम इंडिया - सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार यांचे अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. अनेक ट्वीट्सच्या मालिकेतून त्यांनी प्रत्येक खेळाडूचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

विनेश फोगटचे अभिनंदन करताना ठाकूर यांनी ट्विट केले, ही हॅट्ट्रिक आहे!! विनेश फोगटने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. दुसर्‍या ट्विटमध्ये ठाकूर म्हणाले, नवीनचा विजय #नवभारताच्या भावनेचे प्रतीक आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करणााऱ्या, 19 वर्षीय नवीनने, भारतासाठी आणखी एक सुवर्णपदक जिंकणताना स्पर्धेत कडवा संघर्ष केला. पूजा सिहागचे अभिनंदन करताना क्रीडामंत्र्यांनी ट्विट केले की, #राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पहिल्यांदाच पदक जिंकल्याबद्दल पूजा सिहागचे अभिनंदन.

दुसर्‍या ट्विटमध्ये ठाकूर म्हणाले, विजयाचा दर: 100 टक्के !! दीपक नेहराने कुस्तीत भारतासाठी 12 वे पदक जिंकले. दीपकने त्याच्या पहिल्याच राष्ट्रकुल क्रीडा सहभागात कांस्यपदक मिळवल्याबद्दल त्याचे अभिनंदन.

टोकियो पॅरालिम्पिक पदक विजेती भावना पटेलचे अभिनंदन करणारे ट्विट ठाकूर यांनी केले आहे. 

सोनल पटेलचे अभिनंदन करताना ठाकूर यांनी ट्विट केले, सोनल पटेलचा हा धडाकेबाज विजय आहे कारण तिने तिचे पहिले राष्ट्रकुल पदक जिंकले आहे.

भावीनाला शुभेच्छा देताना ठाकूर यांनी ट्विट केले, भारतासाठी आणखी एक सुवर्ण !! टोकियो पॅरालिम्पिक रौप्य पदक विजेत्या भाविना पटेलने पुन्हा एकदा सिद्ध केले की ती एक असामान्य क्रीडापटू आहे, कारण तिने पॅरा टेबल टेनिसमध्ये भारतासाठी एकमेव सुवर्ण जिंकले आहे. जैस्मिन लांबोरियाचे अभिनंदन करताना क्रीडा मंत्र्यांनी ट्विट केले, " राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच भाग घेऊन पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

लॉन बॉल्स संघाचे अभिनंदन करताना ठाकूर यांनी ट्विट केले, " राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला प्रथमच विविध क्रीडाप्रकारात अनेक पदके जिंकताना पाहून आनंद झाला.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849409) Visitor Counter : 636