आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने केला एकूण 205.92 कोटी लसीच्या मात्रांचा टप्पा पार


12 ते 14 वयोगटातील किशोरांना 3.94 कोटीहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या

देशातील उपचाराधीन रूग्णसंख्या सध्या 1,34,793

गेल्या 24 तासात, 19,406 नवीन रूग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.50% टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.63 टक्के

Posted On: 06 AUG 2022 9:48AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 205.92 कोटींहून (2,05,92,20,794) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,73,35,261 सत्रांतून या लसी देण्यात आल्या.

12 ते 14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.94 कोटी (3,94,13,983) किशोरवयीन मुलांना कोविड-19 ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची खबरदारीची मात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10412407

2nd Dose

10093238

Precaution Dose

6428470

FLWs

1st Dose

18431631

2nd Dose

17676520

Precaution Dose

12480171

Age Group 12-14 years

1st Dose

39413983

2nd Dose

28570987

Age Group 15-18 years

1st Dose

61329558

2nd Dose

51402118

Age Group 18-44 years

1st Dose

559737698

2nd Dose

509721439

Precaution Dose

30692983

Age Group 45-59 years

1st Dose

203726437

2nd Dose

195488035

Precaution Dose

19743829

Over 60 years

1st Dose

127466783

2nd Dose

122170487

Precaution Dose

34234020

Precaution Dose

10,35,79,473

Total

2,05,92,20,794

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 1,34,793 इतकी आहे. एकूण कोविड रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचं प्रमाण 0.31% इतके आहे.

परिणामी, भारतात रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.50 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासात 19,928 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या सुरुवातीपासून) आता 4,34,65,552 इतकी आहे

 गेल्या 24 तासात, 19,406 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात, 3,91,187कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.75 कोटी (87,75,51,833) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.63 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.96 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

****

MC/Radhika/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849022) Visitor Counter : 117