दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

मोबाईल टॉवरच्या स्थापनेशी संबंधित फसवणुकीबद्दल सावधगिरी बाळगण्यासाठी दूरसंचार विभागाकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

Posted On: 05 AUG 2022 5:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या दूरसंचार विभागाने ,मोबाईल टॉवरच्या स्थापनेशी संबंधित फसवणुकीबद्दल सावधगिरी बाळगण्याच्या अनुषंगाने  नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

काही अप्रामाणिक  कंपन्या/संस्था /व्यक्ती सामान्य जनतेची फसवणूक करून  मोबाईल टॉवर्स बसवण्याच्या नावाखाली त्यांना मोठ्या मासिक भाड्याचे  वगैरे  आमिष दाखवत पैसे उकळतात हे   दूरसंचार विभागाच्या   निदर्शनाला आले आहे

खालील मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून या संदर्भात जनतेला  कळवण्यात येते की:-

  1. मोबाइल टॉवर्सच्या स्थापनेसाठी जागा भाडे तत्वावर /भाड्याने देण्यामध्ये दूरसंचार विभाग /ट्रायचा  प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग नाही
  2. दूरसंचार विभाग /ट्राय किंवा त्यांचे अधिकारी मोबाईल टॉवरच्या स्थापनेसाठी कोणतेही "ना हरकत प्रमाणपत्र" जारी करत नाहीत.
  3. मोबाइल टॉवर्स स्थापित करण्यासाठी दूरसंचार सेवा प्रदाते (टीएसपी) आणि पायाभूत सुविधा प्रदाते (आयपी-1) यांची अद्ययावत यादी, https://dot.gov.in आणि  https://dot.gov.in/infrastructure-provider. या दूरसंचार विभागाच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
  4. कोणतीही कंपनी/संस्था /व्यक्ती यांनी मोबाईल टॉवर बसवण्यासाठी पैसे मागितल्यास, अधिक सावधगिरी बाळगावी आणि कंपनीचे अधिकारपत्रे पडताळून ओळख तपासावी  अशा प्रकारची   खबरदारी घेण्याचा  इशारा  जनतेला देण्यात येत आहे. टीएसपी  आणि आयपी -1  संस्थेचे सदस्य मोबाईल टॉवर स्थापित करण्यासाठी पैसे मागत नाहीत, याची खात्री  संस्थेने  केली आहे.
  5. जर कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची फसवणूक आढळली , तर तो/ती व्यक्ती  स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडे संबंधित घटनेची तक्रार दाखल करू     शकतो.
  6. याव्यतिरिक्त, दूरसंचार विभागाच्या   स्थानिक क्षेत्रीय विभागाशी  देखील संपर्क साधला जाऊ शकतो, या संपर्कासाठीचे  तपशील  दूरसंचार विभागाच्या  https://dot.gov.in/relatedlinks/director-general-telecom या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

 

 S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1848888) Visitor Counter : 151