युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 च्या आजच्या 7 व्या दिवशी पुरुषांच्या पॅरा (दिव्यांग क्रीडा स्पर्धा) पॉवरलिफ्टिंग हेवीवेट स्पर्धेत भारताच्या सुधीरने सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे तर पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेत श्रीशंकरने रौप्यपदक जिंकले

Posted On: 05 AUG 2022 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2022

 

राष्ट्रकुल स्पर्धा 2022 च्या आजच्या 7 व्या दिवशी पुरुषांच्या पॅरा (दिव्यांग क्रीडा स्पर्धा) पॉवरलिफ्टिंग हेवीवेट स्पर्धेत भारताच्या सुधीरने सुवर्णपदक जिंकून एक इतिहास रचला आहे. 27 वर्षीय सुधीरला पाॅलीकॉन्ग्रेट्युरमुळे अपंगत्व आले, तरीही हा विजय प्राप्त करून त्याने भारताच्या दिव्यांग गटातील पदकमालिकेचा आरंभ केला.

मुरली श्रीशंकरने पुरूषांच्या लांब उडी स्पर्धेत रौप्यपदक मिळविले, आणि ॲथलेटिक्स प्रकारात दुसरे पदक प्राप्त केले. अशाप्रकारे 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 7 कांस्य पदकांसह भारताने मिळविलेल्या पदकांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे.

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी पदक विजेत्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, यांनी राष्ट्रकुल 2022 मध्ये दिव्यांग - भारोत्तोलन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुधीरचे अभिनंदन केले.

राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटरसंदेशामध्ये म्हटले आहे,

 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा-पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल सुधीरचे अभिनंदन. तुमची उत्साहवर्धक कामगिरी आणि समर्पण यामुळे तुम्ही भारताला पदक मिळवून देत गौरव प्राप्त करून दिला आहे. आपल्याला भविष्यातही असेच चमकदार यश प्राप्त होवो."

ॲथलेटिक्स श्रीशंकर यांचे अभिनंदन करताना, राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटरसंदेशामध्ये म्हटले,

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडी प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल श्रीशंकर यांचे अभिनंदन. तुम्ही घेतलेल्या उंच झेपेमुळे भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पहिले पदक मिळाले आहे. ही अतुलनीय कामगिरी असंख्य भारतीयांना, विशेषतः तरुणांना प्रेरणा देत राहील.

राष्ट्रकुल स्पर्धा-2022 मध्ये दिव्यांग भारोत्तोलन गटातील पुरुषांच्या हेवीवेट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;  " सीडब्ल्यूजी 2022 पॅरा-क्रीडा स्पर्धांची सुधीर कडून चांगली सुरुवात! एक प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जिंकून त्याने पुन्हा एकदा आपले समर्पण आणि दृढ निश्चय दाखवला. तो मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यापुढील सर्व स्पर्धांसाठी त्याचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

पंतप्रधानांनी एम. श्रीशंकर याचेही अभिनंदन केले आणि असे ट्विट केले आहे,

"एम. श्रीशंकरचे CWG मधील रौप्य पदक हे विशेष आहे. अनेक दशकांनंतर भारताने CWG मध्ये पुरुषांच्या लांबउडी स्पर्धेत पदक जिंकले आहे. त्याची कामगिरी भारताच्या भविष्यातील खेळाडूंसाठी

शुभसूचक ठरेल. त्याचे खूप अभिनंदन. येणाऱ्या काळातही तो उत्कृष्ट कामगिरी करत राहो,"

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सुधीरचे अभिनंदन केले आणि ट्विट केले आहे,

सुधीरने CWG 2022 मध्ये भारताच्या पदकतालिकेला आरंभ केला आहे. तुझ्या पहिल्या CWG स्पर्धेतील पदकाबद्दल तुझे अभिनंदन. हरियाणातील आणखी एका खेळाडूने जागतिक मंचावर आपली छाप पाडली आहे. आज मॅटवर कौशल्य आणि चैतन्य दाखवत तू जगाला दाखवून दिलेस की विजेते कसे निर्माण होतात.

एम. श्रीशंकर यांचे अभिनंदन करताना श्री ठाकूर यांनी ट्विट केले,

CWG2022 मध्ये विजयी झाल्याबद्दल एम श्रीशंकर यांचे अभिनंदन. चार दशकांनंतर लांब उडीत मिळविलेले पदक, हा भारतातील खेळांसाठी खरोखरच ऐतिहासिक दिवस आहे. या पदकांमुळे तुम्ही अ‍ॅथलेटिक्सच्या जगात भारताला सातत्याने पुढे आणत आहात. आणखी अनेक ठिकाणी तुम्ही विजयी व्हाल, अशी मला अपेक्षा आहे.

मुरली श्रीशंकर यांच्या कामगिरीसाठी येथे क्लिक करा

सुधीर यांच्या कामगिरीसाठी येथे क्लिक करा

 

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1848749) Visitor Counter : 714