राष्ट्रपती कार्यालय

मालदीवच्या राष्ट्रपतींनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 02 AUG 2022 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

मालदीवचे राष्ट्रपती महामहीम   इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी आज (2 ऑगस्ट, 2022) रोजी  राष्ट्रपती भवन येथे भारताच्या राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती सोलिह यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचा एक जवळचा मित्र आणि एक प्रतिष्ठित नेता ज्यांच्या नेतृत्वाखाली मालदीव एक स्थिर आणि समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला आले आहे, त्यांचे स्वागत करताना आपल्याला  आनंद झाला आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या  की, मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रात भारताचा प्रमुख भागीदार आणि जवळचा मित्र आहे. दोन्ही देशांतील लोकांमध्ये शतकानुशतके मजबूत सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध कायम  आहेत. भारताच्या 'शेजारी प्रथम धोरणात ' मालदीवला विशेष स्थान आहे. गरज ओळखून त्यानुसार आर्थिक आणि विकासासाठी भारताकडून दिले जाणारे  सहाय्य मालदीव सरकारच्या विकास प्राधान्यक्रमांसाठी सहाय्यक ठरत  आहे हे ऐकून आपल्याला आनंद झाला.

राष्ट्रपती म्हणाल्या  की, भारत-मालदीव विकास सहकार्य, संरक्षण आणि सुरक्षा उपक्रम, आर्थिक संबंध आणि लोकांमधील संपर्क यांचा जलद विस्तार हे भारताचे मालदीव सरकार आणि जनतेसोबतच्या संबंधांसाठी चांगले संकेत आहेत. कोविड-19 च्या उद्रेकादरम्यान मालदीव सरकार आणि तिथल्या लोकांच्या धैर्य आणि चिकाटीचे त्यांनी कौतुक केले. महामारीच्या काळात भारत-मालदीव दरम्यान  मजबूत सहकार्य हे  संपूर्ण क्षेत्रासाठी आदर्श ठरले अशा शब्दात प्रशंसा करत त्यांनी  आनंद व्यक्त केला.

भारत-मालदीव भागीदारीत क्षमता निर्मिती  हा प्रमुख स्तंभ म्हणून उदयाला आल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. या दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या  सामंजस्य करारांमुळे मालदीवमध्ये  क्षमता बांधणी  उपक्रमांना आणखी बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847618) Visitor Counter : 145