आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सीजीएचएसच्या वरिष्ठ प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले संबोधित
मानवी आणि भौतिक आरोग्य संसाधने ही समाजासाठी मौल्यवान संपत्ती आहे आणि एक मजबूत आरोग्य सेवा प्रशासन आणि व्यवस्थापन यंत्रणा त्यांचा प्रभावी वापर सुनिश्चित करते: डॉ भारती प्रवीण पवार
‘सीजीएचएस पंचायत’ एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी प्रशासन पद्धती आहे
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2022 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2022
“आपण कामासाठी घराबाहेर पडतो, त्यामुळे आपण आपला दृष्टिकोन बदलूया. समर्पण आणि वचनबद्धतेसह सकारात्मक दृष्टीकोन आणि निरोगी मानसिक आरोग्य हे सुदृढ आणि प्रगतीशील राष्ट्रासाठी महत्वाचा आधार आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. आज नवी दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांच्यासह सीजीएचएसच्या वरिष्ठ प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला ते संबोधित करत होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी सीजीएचएसची कामगिरी अधोरेखित करताना सांगितले की, एक संस्था म्हणून केंद्रीय आरोग्य योजनेने आपले जाळे विस्तारले आहे आणि आता देशभरातील 75 शहरांमध्ये सुमारे 450 निरामयता केंद्रे कार्यरत आहेत. काळाच्या ओघात सेवांचे डिजिटायझेशन आणि विविध नवीन आरोग्य पद्धतींचा समावेश यासारख्या आरोग्य क्षेत्रातील घडामोडींशी जुळवून घेताना त्यात अनेक बदल करण्यात आले.

“सीजीएचएसने अलिकडेच ‘सीजीएचएस पंचायत’ सारखी नवी उत्तम प्रशासन पद्धती स्वीकारली आहे हे कौतुकास्पद आहे. अशा पद्धती सीजीएचएस सेवा प्रणालीच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यात उपयुक्त ठरतात असे त्या म्हणाल्या. मानवी आणि भौतिक आरोग्य संसाधने समाजासाठी मौल्यवान संपत्ती आहेत आणि एक मजबूत आरोग्य सेवा प्रशासन आणि व्यवस्थापन यंत्रणेमुळे त्यांचा प्रभावी वापर होईल याकडे लक्ष दिले जाते.

सीजीएचएसने राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या सहकार्याने सीजीएचएसमधील विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी एक आठवड्याचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. हा प्रशिक्षण कार्यक्रम वरिष्ठ प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2022 या कालावधीत हे प्रशिक्षण होणार असून यातील सुमारे 70 अधिकाऱ्यांना दोन गटांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1846977)
आगंतुक पटल : 224