आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला एकूण 204.34 कोटी मात्रांचा टप्पा


12 ते 14 वयोगटातील 3.90 कोटींपेक्षा जास्त मुलांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,43,989

गेल्या 24 तासात 16,464 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.48%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 4.80%

Posted On: 01 AUG 2022 9:25AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 204.34 (2,04,34,03,676)  कोटींचा टप्पा पार केला आहे.  2,70,63,240 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटासाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू  झाली. आतापर्यंत 3.90 (3,90,36,788) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीनांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10411752

2nd Dose

10090562

Precaution Dose

6336671

FLWs

1st Dose

18430675

2nd Dose

17671846

Precaution Dose

12256120

Age Group 12-14 years

1st Dose

39036788

2nd Dose

27953863

Age Group 15-18 years

1st Dose

61199410

2nd Dose

51070760

Age Group 18-44 years

1st Dose

559547876

2nd Dose

508859031

Precaution Dose

23613779

Age Group 45-59 years

1st Dose

203691845

2nd Dose

195294880

Precaution Dose

15814276

Over 60 years

1st Dose

127443798

2nd Dose

122045377

Precaution Dose

32634367

Precaution Dose

9,06,55,213

Total

2,04,34,03,676

 


भारतात सक्रीय रुग्णभार सध्या  1,43,989 इतका आहे, तो देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.33% इतका आहे.

 

 

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.48% आहे.


गेल्या 24 तासात 16,112 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,33,65,890 झाली आहे.

 

 

गेल्या 24 तासात 16,646 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

गेल्या 24 तासात एकूण 2,73,888  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 87.54 (87,54,81,509)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.80% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 6.01% आहे.

****

ST/SP/CY


(Release ID: 1846868) Visitor Counter : 192