आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 204 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या
12 ते 14 वर्ष या वयोगटातील 3 कोटी 90 लाखांहून अधिक मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली
भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,43,676
गेल्या 24 तासांत देशात 19,673 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.48%
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.88% आहे
Posted On:
31 JUL 2022 9:40AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 204.25 कोटींचा (2,04,25,69,509) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 2,70,50,160 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
16 मार्च 2022 रोजी देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. आतापर्यंत 3 कोटी 90 लाखांहून अधिक (3,90,25,191) किशोरवयीनांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022 सुरु करण्यात आले आहे.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
10411727
|
2nd Dose
|
10090442
|
Precaution Dose
|
6326405
|
FLWs
|
1st Dose
|
18430638
|
2nd Dose
|
17671600
|
Precaution Dose
|
12232865
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
39025191
|
2nd Dose
|
27933544
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
61195423
|
2nd Dose
|
51060366
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
559537449
|
2nd Dose
|
508818122
|
Precaution Dose
|
23227539
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
203689535
|
2nd Dose
|
195285059
|
Precaution Dose
|
15599185
|
Over 60 years
|
1st Dose
|
127442557
|
2nd Dose
|
122039388
|
Precaution Dose
|
32552474
|
Precaution Dose
|
8,99,38,468
|
Total
|
2,04,25,69,509
|
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता 1,43,676 इतकी आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही संख्या 0.33% आहे.
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.48% झाला आहे. गेल्या 24 तासांत 19,336 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,33,49,778 झाली आहे.
गेल्या 24 तासांत, देशात नव्या 19,673 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 3,96,424 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 87 कोटी 52 लाखांहून अधिक (87,52,07,621) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 4.88% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.96% इतका नोंदला गेला आहे.
***
SK/VY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846686)
Visitor Counter : 166