आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकवरील नवीन निर्दिष्ट आरोग्य इशारा
Posted On:
29 JUL 2022 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2022
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियम, 2008 मध्ये, GSR 592 (E) 21 जुलै 2022 “द सिगारेट्स आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) तिसरी दुरुस्ती नियम, 2022 द्वारे सुधारणा करून सर्व तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकसाठी विशिष्ट आरोग्य इशाऱ्यांचे नवीन संच अधिसूचित केले आहेत. सुधारित नियम 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील.
निर्दिष्ट आरोग्य इशाऱ्यांचा नवीन संच असा असेल-
छायाचित्र-1, 1 डिसेंबर 2022 पासून सुरू झाल्यानंतर बारा महिन्यांच्या कालावधीसाठी वैध असेल.
छायाचित्र-2, जी छायाचित्र-1 ची निर्दिष्ट आरोग्य इशारा सुरू झाल्याच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या समाप्तीनंतर लागू होईल.
सदर अधिसूचना 19 भाषांमधील निर्दिष्ट आरोग्य इशाऱ्यांच्या सॉफ्ट किंवा प्रिंट करण्यायोग्य आवृत्तीसह www.mohfw.gov.in आणि ntcp.nhp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
वरील बाबी लक्षात घेता कळविण्यात येते की;-
- 1 डिसेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित किंवा आयात केलेली किंवा पाकिटबंद केलेली सर्व तंबाखूजन्य उत्पादने 'तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू' अशा शाब्दिक आरोग्य इशाऱ्यासह छायाचित्र -1 प्रदर्शित करतील आणि 1 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित किंवा आयात केलेली किंवा पाकिटबंद केलेली सर्व तंबाखूजन्य उत्पादने 'तंबाखू वापरकर्ते तारुण्यातच मरतात' या शाब्दिक आरोग्य इशाऱ्यासह छायाचित्र -2 प्रदर्शित करतील.
- सिगारेट किंवा कोणत्याही तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, पुरवठा, आयात किंवा वितरण यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे गुंतलेली कोणतीही व्यक्ती हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की सर्व तंबाखूजन्य उत्पादनांच्या पॅकेजेसमध्ये विहित केलेल्या विशिष्ट आरोग्य इशारे दिलेले असतील.
- सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरातीवर बंदी, व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण) अधिनियम, 2003 च्या कलम 20 मध्ये विहित केल्यानुसार उपरोक्त तरतुदीचे उल्लंघन हा तुरुंगवास किंवा दंडासह दंडनीय गुन्हा आहे.
- 21 जुलै 2020 रोजी GSR 458 (E) द्वारे अधिसूचित, विद्यमान निर्दिष्ट आरोग्य इशारा (छायाचित्र-2) – 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वैध राहील.
* * *
R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846264)
Visitor Counter : 234